Netflix Content Head and IB Ministry Meeting : कंदहार विमान अपहरणाच्या घटनेवर आधारीत असलेली 'IC814 द कंदहार हायजॅक' (IC 814 The Kandahar Hijack) ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेब सीरिजमुळे नेटफ्लिक्सच्या कंटेट हेडला माहिती प्रसारण मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आलं होतं. आता नेटफ्लिक्स आणि मंत्रालयाची बैठक पार पडली आहे. नेटफ्लिक्स कंटेंट हेड आणि माहिती-प्रसारण मंत्रालय यांच्या झालेल्या बैठकीत IC 814 वेब सीरिजवर आक्षेप घेण्यात आला आहे.


IC  814 वेब सीरीजचा कंटेंट बदलणार? 


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि नेटफ्लिक्स कंटेंट हेड यांच्यातील बैठक संपली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने सरकारला आश्वासन दिलं आहे की, भारतातील लोकांच्या भावना लक्षात घेऊनच प्लॅटफॉर्मवर सामग्री अपलोड केली जाईल. नेटफ्लिक्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, त्यांना IC 814 वेब सीरीजमधील कंटेंटबाबत तक्रार प्राप्त मिळाली आहे. या प्रकरणात, Netflix टीम तपशीलवार कंटेंट पाहणार आहे.






नेटफ्लिक्स आणि माहिती-प्रसारण मंत्रालयाची बैठक


यापूर्वी शास्त्री भवनातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांच्या कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडसह दोन वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजूही उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत IC 814 वेब सीरीजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटबाबत विशेष चर्चा झाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Somy Ali : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, "अनेक महिलांना अभिनेत्याच्या रुममधून अस्ताव्यस्त परिस्थितीत बाहेर पडताना पाहिलंय"