Brahmastra : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022ची सुरुवात शनिवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्याने झाली. या खास प्रसंगी 'ब्रह्मास्त्र'ची टीमही मैदानावर उपस्थित होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji), अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी आयपीएल 2022 लाँचचा आनंद लुटला. यावेळी अयान मुखर्जीला, तो 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात कोणत्या क्रिकेटरला कास्ट करू इच्छितो आणि का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अयान मुखर्जी म्हणाला की, 'क्रिकेटशी संबंधित सर्व प्रश्नांसाठी माझे उत्तर नेहमीच विराट कोहली असते.'
अयान मुखर्जी म्हणाला, 'ब्रह्मास्त्रला खऱ्या सुपरस्टार स्पिरिटची गरज आहे, त्यामुळे मला विराट कोहलीला कास्ट करायला आवडले असते.' अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’साठी कास्टिंगशी संबंधित अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तर, रणबीर कपूरने एकदा महेंद्रसिंह धोनीसोबत खेळलेल्या सामन्याचा अनुभव सांगितला. रणबीर कपूर म्हणाला की, मला भारतीय क्रिकेट संघासोबत खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.
रणबीरने धोनीसोबत खेळला सामना!
रणबीर कपूर म्हणाला, 'मला फुटबॉल खेळादरम्यान एमएस धोनीकडून खूप काही शिकायला मिळाले. मी संपूर्ण क्रिकेट संघासोबत काही सामने खेळू शकलो, हे माझे भाग्य आहे. ते सर्व उत्तम फुटबॉल खेळाडू आहेत.’ यावेळी आलिया भट्टळा तिचे आवडते खेळाडू विचारले असता, ती म्हणाली, 'रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, महेंद्रसिंग धोनी आणि बुमराह. हे सर्व माझ्या आवडत्या यादीत येतात.’
'ब्रह्मास्त्र'ची चर्चा!
आलिया भट्टच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा आणखी एक टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये आलिया भट्टचे चित्रपटातील लूक्स शेअर करण्यात आले होते. 'गंगूबाई काठियावाडी' फेम अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार असून, यात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. 'ब्रह्मास्त्र' हा पहिला चित्रपट असेल, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार आहेत.
हेही वाचा :
- ABP Ideas of India : फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला...
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, 'दफा कर'ची चाहत्यांमध्ये क्रेझ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha