Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) 'हीरोपंती 2' (Heropanti 2) सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सिनेमातील पहिले गाणं 'दफा कर' (DaFa Kar) रिलीज झाले आहे. सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. 

'दफा कर' गाण्यात टायगर श्रॉफ सिंहासनावर बसलेला दिसत आहे. तारा सुतारियानेदेखील तिच्या हटके अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. टायगर श्रॉफच्या चाहत्यांमध्ये सध्या या गाण्याची क्रेझ आहे. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाची केमिस्ट्री या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'हीरोपंती 2' सिनेमातील पहिलेच गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याचे प्रचंड कौतुक होत आहे. 'हीरोपंती 2' सिनेमातील हे गाणं ए आर रहमान आणि हिरल विराडिया यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल मेहबूब कोतवाल यांनी लिहिले आहेत.

संबंधित बातम्या

World Theatre Day 2022 : 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' ते 'सारखं काहीतरी होतंय', जागतिक रंगभूमी दिनी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी!

ABP Ideas of India: आता बॉलीवूड, टॉलीवूड हे शब्द वापरण्याऐवजी 'इंडियन फिल्म इंडस्ट्री' म्हणावं: करण जोहर

Bollywood Movies : 'गंगूबाई काठियावाडी' ते 'बच्चन पांडे', नवीन वर्षात 'या' सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha