​TIFR Jobs 2022 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, पुणे (TIFR) येथे नोकरीची संधी आहे. टाटा इंस्टिट्यूटकडून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत इंजिनिअर-डी (Engineer-D) यांसह इतर पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार tifr.res.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. 


रिक्त पदांचा तपशील


या भरती प्रक्रिये अंतर्गत इंजिनिअर-डीच्या एका पदावर भरती करण्यात येणार आहे. याशिवाय प्रशासकीय अधिकारी - सी अकाउंट्स (Administrative Officer) एक पद, प्रशासकीय अधिकारी - सी (परचेस अ‍ॅन्ड स्टोर) एक पद, इंजिनिअर-सी (डिजिटल) एक पद आणि इंजिनिअर-सी (इलेक्ट्रॉनिक्स) साठी एका रिक्त पदावर भरती करण्यात येणार आहे.


शैक्षणिक पात्रता



  • इंजिनिअर-डी : या पदासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठातून 60 टक्के गुणांसह सिव्हिल स्ट्रिममध्ये M.E./M.Tech असणे आवश्यक आहे.

  • प्रशासकीय अधिकारी - सी अकाउंट्स : या पदासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठातून वाणिज्य (Commerce) शाखेत 55 टक्के गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएट अॅडव्हान्स्ड अकाउंटन्सी/ऑडिटिंग/टॅक्सेशन विषय किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठातून किमान 60 टक्के गुणांसह वाणिज्य/बीकॉम, इंटर-सीए किंवा सीएमएमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

  • प्रशासकीय अधिकारी - सी (परचेस अ‍ॅन्ड स्टोर) : इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापिठातून 60 टक्के गुणांसह पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठातून व्यवस्थापनातील डिप्लोमा/पदवी असणं आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

  • इंजिनिअर-सी (डिजिटल) : या पदासाठी इच्छुक उमेदवार संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापिठातून अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.

  • इंजिनिअर-सी (इलेक्ट्रॉनिक्स) : इच्छुक उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठातून इलेक्ट्रॉनिक्स / समकक्ष अभियांत्रिकीमध्ये पदवी असणं आवश्यक आहे.


वयोमर्यादा



  • इंजिनिअर-डी : कमाल वय 35 वर्ष

  • प्रशासकीय अधिकारी - सी अकाउंट्स : कमाल वय 40 वर्ष

  • प्रशासकीय अधिकारी - सी (परचेस अ‍ॅन्ड स्टोर) : कमाल वय 43 वर्ष

  • इंजिनिअर-सी (डिजिटल) : कमाल वय 31 वर्ष

  • इंजिनिअर-सी (इलेक्ट्रॉनिक्स) : कमाल वय 28 वर्ष


कशी असेल निवड प्रक्रिया?


या भरतीअंतर्गत उमेदवाराची निवड गुणवत्ता आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.


येथे करा अर्ज?


या भरतीसाठी इच्छुक उमेदवार tifr.res.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात.