Padma Rani Omprakash passes away : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशनच्या (Hrithik Roshan) आजीचे म्हणजेच पद्मा रानीओमप्रकाश (Padma Rani) यांचे निधन झाले आहे.  वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्या ती बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. गुरुवारी (16) त्यांचे मुंबई येथे निधन झालं आहे. रिपोर्टनुसार, रात्री तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (शुक्रावार) पद्मा रानी यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


ह्रतिकच्या आजोबांचे म्हणजेच जे ओमप्रकाश यांचे 7 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले होते. जे ओमप्रकाश यांनी आप की कसम, अर्पण, अपनानपन आणि आदमी खिलौना है  या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केलं.  2004 मध्ये, हृतिकचे आजोबा जे ओमप्रकाश यांना एशियन गिल्ड ऑफ लंडनने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पती जे ओमप्रकाश यांच्या निधनानंतर पद्मा राणी गेल्या काही वर्षांपासून रोशन कुटुंबासोबत राहत होत्या. त्याची मुलगी आणि हृतिक रोशनची आई पिंकी राणी अनेकदा त्यांच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होत्या. पिंकी राणी यांनी पद्मा रानी यांचे निधन झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. पोस्टला त्यांनी कॅप्शन दिले होते, ''माझी आई पद्मा राणी ओमप्रकाश ही आम्हाला सोडून गेली. प्रेम, शांती आणि कृतज्ञ.' अनेकांनी पिंकी यांच्या पोस्टाला कमेंट करुन पद्मा रानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 






ह्रतिक देखील त्याच्या आजीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत होता. 


'विक्रम वेधा' हा ह्रतिकचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटामध्ये ह्रतिकसोबतच अभिनेता सैफ अली खान हा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 


हेही वाचा :