Hrithik Roshan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन(Hrithik Roshan)चा लवकरच विक्रम वेधा (Vikram Vedha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक चित्रपट असणार आहे. पुष्कर आणि गायत्री ही जोडी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या दोघांनी या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सोशल मीडियावर नुकताच ह्रतिकनं त्याचा विक्रम वेधा चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला. या फोटोला त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) नं खास कमेंट केली आहे. 
 
ह्रतिक रोशननं त्याच्या ऑल इन ब्लॅक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तो ब्लॅक डेनिम आणि ब्लॅक टी-शर्ट अशा लूकमध्ये दिसत आहे. तसेच त्यानं ब्लॅक सन ग्लासेस घातलेले दिसत आहेत. सबानं त्याच्या या फोटोला कमेंट करत लिहिले, 'Why hello' असं लिहिलं. तसेच सबानं ब्लॅक हार्ट इमोजी देखील शेअर केलं आहे. जायद खाननं कमेंट करत लिहिले,   'किलिंग इट ब्रदर'! 






ह्रतिकच्या फॅमिली फोटोमध्ये दिसली सबा 
ह्रतिकचा फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सबा देखील दिसत होती. 20 फेब्रुवारी रोजी ह्रतिक रोशनच्या फॅमिलीसोबत संडे लंच करण्यसाठी सबा त्याच्या घरी गेली होती.  राजेश रोशननं हा फॅमिली फोटो शेअर केला होता. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha