Superstar Earned 15 Million By Speaking 3 Words: फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) नाव कमावणं एवढं सोपं नाही, पण जर तुम्हाला इंडस्ट्रीची गुरूकिल्ली सापडली, तर मग यशाचं सर्वोच्च शिखर गाठण्यापासून तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही. इंडस्ट्रीत तर असेही अनेक किस्से आहेत, ज्यामध्ये अभिनेत्याला (Actor) थोडंथोडकं काम करावं लागतं, पण त्याची मोठी किंमत मिळते. आज चित्रपटांमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या जोरावर कलाकार करोडपती आणि अब्जाधीशही बनले आहेत.

Continues below advertisement

मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांसाठी कलाकार सहसा कोट्यवधी रुपये घेतात. पण, तुम्ही कधी ऐकलंय का? अभिनेत्यानं मोठी फी घेतली. पण, तो पडद्यावर कधी दिसलाच नाही. तर, फक्त त्याचा आवाज ऐकू आला. तेसुद्धा फक्त आणि फक्त तीनच शब्द. ही हॉलिवूडमध्ये घेतलेल्या सर्वाधिक मानधनाची कहाणी आहे.  

आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव विन डिझेल. विन डिझेल 'फास्ट अँड द फ्युरियस' सीरिजमधील त्याच्या क्लासी भूमिकेसाठी ओळखला जातो. या फ्रँचायझीच्या एका चित्रपटासाठी त्याला सुमारे 47 मिलियन डॉलर्स मिळाले आणि या सीरिजमधून त्याची एकूण कमाई सुमारे 200 मिलियन डॉलर्स आहे. पण, गेल्या काही वर्षांत विनचे ​​समानार्थी बनलेले आणखी एक पात्र आहे - मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील ग्रूटचे पात्र. अभिनेत्याने पहिल्यांदा 2014 मध्ये 'गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम 1' मध्ये या पात्राला आवाज दिला आणि दोन सिक्वेलमध्ये तसेच दोन अ‍ॅव्हेंजर्स चित्रपटांमध्ये - इन्फिनिटी वॉर आणि एंडगेममध्ये त्याला पुन्हा आवाज दिला.

Continues below advertisement

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांपासून विन डिझेल ग्रूटची भूमिका साकारण्यासाठी प्रत्येक चित्रपटासाठी 13.5 मिलियन डॉलर्सची कमाई करत होता. पण 'गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी'चे दिग्दर्शक जेम्स गन यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, एमसीयू भूमिकेसाठी अभिनेत्याची कमाई 12-15 मिलियन डॉलर्सच्या दरम्यान आहे. वॉईस अॅक्टिंगसाठी विन डिझेलची सर्वाधिक कमाई आहे. 

फक्त तीन शब्द म्हटले अन् 15 मिलियन कमावले 

गंमतीशीर बाब म्हणजे, संपूर्ण MCU मध्ये, ग्रूट फक्त तीन शब्द 'आय एम ग्रूट' म्हणतो... पण त्याचा आवाज आणि स्वर फारच वेगळा आहे. दुसऱ्या गार्डियन्स चित्रपटात फक्त एकदाच पात्र त्याच्या शब्दांपासून विचलित झालं आणि 'वी आर ग्रूट' असं म्हटलं. मार्वल स्टुडिओनं अभिनेत्याची लोकप्रियता आणि फॉलोअर्स लक्षात घेऊन त्याला हे पैसे दिल्याचं बोललं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IIT Graduate Became Monster In Horror Movie: भयानक चेहऱ्यामुळे हॉरर फिल्म्सचा राक्षस बनला 'हा' IIT ग्रॅज्युएट; ओबडधोबड चेहरा, विचित्र उंचीमुळे बॉलिवूडमधून केलेलं बेदखल, ओळखता का कोण?