Continues below advertisement

Surya Grahan 2025: ज्याप्रमाणे चंद्रग्रहण कधी होणार? त्याचा सुतक काळ वैध असणार का? अशा अनेक प्रश्नांची सर्वांना उत्सुकता होती, त्याप्रमाणे अखेर 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण पार पडले आहे आणि त्यानंतर लवकरच सूर्यग्रहण देखील होणार आहे. 2025 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आता होणार आहे. ज्याप्रमाणे पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी चंद्रग्रहण झाले, त्याचप्रमाणे पितृपक्षातच हे सूर्यग्रहण होत आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या..

2025 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी होणार?

पंचांगानुसार, सूर्यग्रहण रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. ते आंशिक सूर्यग्रहण असेल. भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10:59 वाजता सुरू होईल आणि सुमारे साडेचार तासांनी पहाटे 3:23 वाजता संपेल. या सूर्यग्रहणाचा मधला काळ दुपारी 1:11 वाजता असेल.

Continues below advertisement

भारतात सूर्यग्रहण दिसेल का?

ज्योतिषींच्या मते, हिंदू धर्मानुसार, सूर्यग्रहणाचा सुतक काळ 12 तास आधी सुरू होतो. मात्र 2025 सालचे शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. सूर्यग्रहणाच्या वेळी भारतात रात्र असल्याने ते भारतात दिसणार नाही, ज्यामुळे त्याचा सुतक काळही वैध नाही. यापूर्वी, मार्चमध्ये होणारे सूर्यग्रहण देखील भारतात दिसत नव्हते.

सूर्यग्रहण कुठे दिसेल?

2025 वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात दिसेल. याशिवाय, हे आंशिक सूर्यग्रहण न्यूझीलंड, अंटार्क्टिका आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रात दिसेल.

2025 च्या सूर्यग्रहणाचा विविध राशींवर परिणाम

सप्टेंबरमध्ये होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा राशींवर परिणाम होईल. 4 राशी आहेत ज्यांवर सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या राशी आहेत - मिथुन, कन्या, धनु आणि मीन.

2026 मध्येही सूर्यग्रहण होईल

सप्टेंबर 2025 च्या सूर्यग्रहणानंतर, पुढील सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी होईल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे, ज्याला इंग्रजीत रिंग ऑफ फायर म्हणतात. यामध्ये, संपूर्ण सूर्याऐवजी, फक्त एक सोनेरी अंगठी दिसते.

हेही वाचा :           

Chandra Grahan 2025: चंद्रग्रहणानंतर अखेर 'या' 3 राशींच्या नशीबाचे दार उघडले! नोकरीत पगारवाढ, बक्कळ पैसा हाती, श्रीमंतीचे योग..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)