Angelina Jolie: युक्रेन आणि रशियामध्ये (Ukraine-Russia War) सुरू असलेल्या युद्धामुळे तिथली स्थानिक परिस्थिती अजूनच बिकट होत चालली आहे. युक्रेनमध्येही सर्वत्र विध्वंसाचे दृश्य दिसत आहे. आता याच दरम्यान हॉलिवूड स्टार अँजेलिना जोली (Angelina Jolie) थेट युक्रेनमध्ये पोहोचली आहे. युक्रेनमधील ल्विव्ह येथील एका कॅफेमध्ये अभिनेत्री स्पॉट झाली. युक्रेनमध्ये येऊन अभिनेत्रीने येथील लहान मुले आणि स्थानिक स्वयंसेवकांची भेट घेतली. अँजेलिना जोलीच्या या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
अँजेलिना जोली UNHCR ची विशेष दूत म्हणून युक्रेनमध्ये आली आहे. यादरम्यान तिने युक्रेनमधील लोकांना वैद्यकीय आणि मानसिक मदत करणाऱ्या युक्रेनियन वैद्यकीय स्वयंसेवकांचीही भेट घेतली. यादरम्यान अँजेलिनाने डोनेस्तक प्रदेशातून बाहेर काढण्यात आलेल्या अनाथ आणि जखमी मुलांचीही भेट घेतली. रशियन आक्रमणातून वाचण्यासाठी आतापर्यंत 5.3 दशलक्षाहून अधिक लोकांनी युक्रेन सोडले आहे.
अलीकडेच अँजेलिना जोलीने रोममधील एका रूग्णालयालाही भेट दिली, जिथे निर्वासित मुलांना ठेवण्यात आले आहे. यावेळी तिने युक्रेनबद्दल चिंता आणि पाठिंबा व्यक्त केला.
पहा व्हिडीओ :
कॅफेमधून अँजेलिनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती अचानक कॅफेमध्ये पोहोचून सर्वांना आश्चर्याचा धक्का देते. परंतु, त्याच कॅफेमध्ये बसलेल्या एका लहान मुलाचे लक्ष तिच्याकडे ह्जात नाही. तो त्याच्या फोनमध्ये गुंग आहे. मात्र, तिच्याकडे लक्ष गेल्यावर अँजेलिना जोलीला युक्रेनमधील चाहत्यांनी चारही बाजूंनी घेरले होते. यावेळी अँजेलिनाने एका लहान मुलीला गुदगुल्या करून हसवलं. अभिनेत्री लहान मुलांच्या बाबतीत खूप संवेदनशील आहे.
हॉलिवूड स्टार अँजेलिना जोली जवळजवळ दोन दशकांपासून संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांच्या उच्चायुक्ताशी संबंधित आहे आणि लोकांच्या भल्यासाठी काम करते. मार्चच्या सुरुवातीला, येमेनी गृहयुद्धादरम्यान निर्वासितांना मदत देण्यासाठी तिने या देशालाही भेट दिली होती.
हेही वाचा :