Aamir Khan On Dr. Shriram Lagoo: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' (Mister Perfectionist) आमिर खान (Aamir Khan), सध्या त्याच्या नुकत्याच आलेल्या 'सितारे जमिन पर' (Sitare Zamin Par) सिनेमामुळे चर्चेत आहे. आमिरची सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्याची पद्धत नेहमीच थोडीशी हटके असते. आमिरची एखादा विषय सिनेमातून मांडण्याची पद्धत फारच वेगळी असते. त्यामुळे आमिर खाननं एखादा सिनेमा अनाउंस केला की, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. पण, तुम्हाला माहितीये का? आज सुपरडुपर हिट सिनेमे देणाऱ्या आमिर खानला मात्र त्याच्या उमेदीच्या काळात फार मोठा संघर्ष करावा लागला होता. याबाबत स्वतः आमिर खाननं खुलासा केला आहे. आमिर खाननं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, ज्यावेळी त्यानं एक शॉर्ट फिल्म करायचं ठरवलं, त्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी त्यानं मराठी रंगभूमीचे 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू (Dr. Shriram Lagoo) यांच्याकडे मदत मागितलेली आणि त्यांनीही कोणताही प्रश्न न विचारता आमिरला त्या काळात 10 हजारांची मदत केली होती. 

आमिर खाननं द लल्लंनटॉपला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक किस्सा सांगितला. आमिरनं सांगितलं की, तो शाळेत असताना त्याला आणि त्याच्या मित्राला एक शॉर्ट फिल्म बनवायची होती. आमिर त्यात स्वतः अॅक्टर, प्रोडक्शन मॅनेजर आणि अगदी स्पॉट बॉय म्हणूनही काम पाहणार होता. पण, पैसे नव्हते, त्यावेळी आमिर खाननं शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर त्यानं दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्याकडून कॅमेरा मागितला आणि अॅडलॅब्सच्या मनमोहन शेट्टी यांच्याकडून रीलची व्यवस्था केली. आमिर खान आणि त्याच्या मित्रानं सर्व आवश्यक तयारी केली आणि शॉर्ट फिल्मला सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी मिळून 40 मिनिटांची सायलेंट फिल्म बनवली.

आमिर खान डॉ. श्रीराम लागूंचा किस्सा सांगताना काय म्हणाला? 

The Lallantop च्या Guest In The Newsroom कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी आमिर खान उपस्थित होता. यावेळी बोलताना आमिर खाननं त्याच्या एक किस्सा ऐकवला. आमिरनं सांगितलं की, "दहावीनंतर मी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. माझ्या वर्गात आदित्य भट्टाचार्य होता. बासु दा (दिग्दर्शक बासु भट्टाचार्य) यांचा तो मुलगा. तो एक शॉर्ट फिल्म बनवत होता. त्याने मला विचारलं. मी होकार दिला. या शॉर्ट फिल्मसाठी मी त्याचा अभिनेता, स्पॉट बॉय, फायनान्स मॅनेजर सर्व होतो. पॅरेनॉया असं त्या सिनेमाचं नाव होतं. आम्हाला सिनेमा बनवायचा होता पण आमच्याकडे पैसे नव्हते."

"त्यावेळी आदित्यने सांगितलं की, याच बिल्डिंगमध्ये डॉ. श्रीराम लागू राहतात. आपण त्यांच्याकडे पैसे मागून बघूया. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी गेलो. तेव्हा आम्ही फक्त 14-15 वर्षांचे होतो. कोणत्या कारणानं घरी आलात? असं डॉ. लागूंनी विचारलं. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही एक सिनेमा बनवतोय त्यासाठी आम्हाला पैसे हवेत. त्यांनी विचारलं किती? आम्ही सांगितलं 10 हजार."

"त्यानंतर डॉ. लागू त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी 10 हजार रुपये आम्हाला आणून दिले. हे घ्या आणि बनवा सिनेमा, असं ते आम्हाला म्हणाले. ही गोष्ट 1980-81 ची आहे. त्यावेळी दहा हजार खूप मोठी रक्कम होती. पण त्यांनी अगदी सहज आम्हाला हे पैसे दिले.", असं आमिर खान म्हणाला. पुढे तो म्हणाला की, "शॉर्ट फिल्मच्या निर्मिती प्रक्रियेत माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. या सिनेमानंतर त्यानं सिनेसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kareena Kapoor Botox Treatment: 'मी बोटॉक्सच्या विरोधात....' शेफाली जरीवालाच्या निधनानंतर करिना कपूरचं स्टेटमेंट व्हायरल