Balasaheb Thorat : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बोलण्यात हुशार आहेत. मात्र ती सभा राज ठाकरेंची नव्हे तर भाजपची होती असं वाटल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं. खरे खुरे राज ठाकरे झाकळले आहेत. ते कोणाच्या तरी सांगण्यावरुन बोलणारे राज ठाकरे दिसतात. हे पूर्वीचे राज ठाकरे नाहीत असा टोलाही थोरात यांनी राज ठाकरे यांना लगावला.


आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जयंतीनिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. थोरात यांनी संगमनेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांसी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या सभेवर वक्तव्य केलं. देशाला दिलेल्या घटनेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे किमयागार आहेत. राज्यघटनेची तत्वे जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तरच देश व्यवस्थित चालू शकतो असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दुर्दैवाने आज काही लोक जाती जातीत, धर्मा धर्मात भेद निर्माण करण्याचे काम करत असल्याचे थोरात यांनी सांगितले.


दरम्यान, काल मुख्यमंत्री मंत्रालयात आले, अधिकाऱ्यांना भेटले ही चांगली गोष्ट असल्याचे थोरात म्हणाले. थोडा आजारपणाचा कालखंड सोडला तर 2 वर्ष मुख्यमंत्री हेच सगळा कारभार पाहत होते. कोरोना काळातही कोणता दोष न ठेवता त्यांनी काम केलं. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. राज्य सरकारने सण उत्सवांवरील निर्बंध हटवल्याने मोठ्या उत्साहात सण साजरे केले जात आहेत. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आहे. त्यानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनीही विनम्र अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. 


महत्त्वाच्या बातम्या: