Hema Malini Talks About Dharmendra Prayer Meet: 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89व्या वर्षी बॉलिवूडचे (Bollywood News) 'हीमॅन' धर्मेंद्र (Dharmendra) यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर तब्बल एक महिना लोटल्यानंतर हेमा मालिनी (Hema Malini) यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं आहे. धर्मेंद्र यांचं जाणं म्हणजे, आयुष्यात कधीही न विसरता येणारा धक्का, असं वर्णन केलं आहे. तसेच, ज्यावेळी धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, तेव्हा नेमकं काय घडलं हेसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, गेला महिना त्यांच्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठीच मोठा धक्का होता. हा काळ खूपच वेदनादायी होता, कारण धर्मेंद्र आजारी असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत पहिल्यांदाच बोलल्या हेमा मालिनी
ईटाइम्सशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, "आम्ही सर्वजण तिथे होतो - मी, ईशा, अहाना, सनी, बॉबी, सर्वजण एकत्र होतो. हे आधीही घडलं होतं, जेव्हा ते रुग्णालयात गेले आणि बरे झाले आणि घरी परतले. आम्हाला वाटलं होतं की, ते यावेळीही परत येतील... ते आमच्याशी चांगले बोलत होते. त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या (16 ऑक्टोबर) शुभेच्छाही दिल्या..." त्यांचा वाढदिवस 8 डिसेंबरला येत होता, जेव्हा ते 90 वर्षांचे झाले असते आणि आम्ही तो मोठ्या उत्साहात साजरा करण्याची योजना आखत होतो. तयारी सुरू होती, आणि अचानक त्यांना या जगाचा निरोप घेतला. आमच्या डोळ्यांसमोर त्यांना कमकुवत होताना पाहणं खूप कठीण होतं. कोणालाही अशा परिस्थितीतून जावं लागू नये...
हेमा मालिनींनी सांगितलं दोन प्रार्थना सभा का? घेतल्या...
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दोन वेगवेगळ्या प्रार्थना सभा घेण्यात आल्या. 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुलं सनी आणि बॉबी देओल यांनी आयोजित केलेली एक प्रार्थना सभा आणि 11 डिसेंबर रोजी दिल्लीत त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि मुली ईशा आणि अहाना देओल यांनी आयोजित केलेली दुसरी प्रार्थना सभा. वेगवेगळ्या प्रार्थना सभांमागील कारण स्पष्ट करताना हेमा मालिनी म्हणाल्या की, "ही आमच्या कुटुंबातील वैयक्तिक बाब आहे..."
कुटुंबातील सदस्यांनी आधी आपापसांत या विषयावर चर्चा केली. हेमा पुढे म्हणाल्या की, त्यांचे जवळचे लोक वेगळे असल्यानं त्यांनी त्यांच्या घरी प्रार्थना सभा आयोजित केली. दिल्लीत झालेल्या प्रार्थना सभेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, त्या राजकारणात असल्यानं, त्या क्षेत्रातील त्यांच्या मित्रांसाठी तिथे प्रार्थना सभा आयोजित करणं महत्त्वाचं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :