Hema Malini Viral Video After Dharmendra Cremation: बॉलिवूडचे (Bollywood News) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी जगाचा निरोप घेतला आणि ते अनंतात विलीन झाले. मुंबईतील (Mumbai News) विलेपार्ले (Vile Parle) येथील पवनहंस स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बस सहा दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या सुपरस्टारला अखेरचा अलविदा करण्यासाठी जवळपास अख्खं बॉलिवूड उपस्थित होतं. तसेच, यावेळी संपूर्ण देओल कुटुंब शोकसागरात बुडालेलं. धर्मेंद्र यांच्यावरचे अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) आणि मुलगी ईशा देओल (Esha Deol) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आपला आधार गमावलेल्या मायलेकी दुःखात पार बुडाल्याचं पाहायला मिळालं. अशातच सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी आणि ईशा देओल मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर हात जोडताना दिसतायत.  

Continues below advertisement


हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी जोडले हात 


सोशल मीडियावर आलेला हेमा मालिनी आणि ईशा देओलचा हा व्हिडीओ पिंकव्हिला इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ विले पार्ले स्मशानभूमीच्या बाहेरचा आहे. धर्मेंद्र यांच्यावरील अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर दोघी मायलेकी दिसल्या. व्हिडीओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि डोळ्यात अश्रू स्पष्टपणे दिसत आहेत. हेमा आणि ईशा यांनीही माध्यमांसमोर अक्षरशः रडत रडतच हात जोडले. दोघींना पाहून नेटकरीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, त्यांच्या पोस्टवर विविध प्रतिक्रियाही येत आहेत. काहींनी व्हिडीओवर कमेंट करतच म्हटलंय की, "या दुःखाच्या काळात त्यांना एकटं सोडा, त्यांना त्रास देऊ नका..."






कुठे झाले धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार? 


हिंदी सिनेमांचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या जगाचा निरोप घेतला. सोमवारी म्हणजे,  24 नोव्हेंबर रोजी सकाळी धर्मेंद्र यांचं निधन झालं. मुंबईत विले पार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांचा थोरला लेक सनी देओलनं त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. धर्मेंद्र यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. 


अंत्यसंस्कारावेळी कोण-कोण झालं सामील?


धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, सलीम खान, संजय दत्त, आमिर खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शबाना आजमी, पूनम ढिल्लों यांच्यासह अनेक बडे स्टार्सही धर्मेंद्र यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी उपस्थित होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sachin Pilgaonkar On Dharmendra: 'धरमजींना दिग्दर्शित करणं, माझ्यासाठी खूपच खास होतं...'; सचिन पिळगांवकरांनी सांगितला धर्मेंद्रंचा 'तो' किस्सा