चेन्नई : मल्याळम फिल्म अभिनेत्री मीनू मुनीरने सोमवारी एका सिनियर एक्टरवर गंभीर आरोप केले आहेत. मुकेश एम आणि जयसूर्या यांचं नाव घेऊन अभिनेत्री मीनूने लैंगिक शोषणाबाबत खुलास केलाय. विशेष म्हणजे फेसबुकवर पोस्ट करुन तिने सिनियर अभिनेता मुकेश, Maniyanpilla Raju, Idavela Babu आणि जयसूर्या यांनी शारिरीक आणि अश्लील भाषा वापरुन छळ केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.
माझ्यासोबत शारिरीक आणि लैंगिक (Abuse) भाषेचा वापर करुन माझा छळ करण्यात आला. सन 2013 साली एका प्रोजेक्टवर काम करत असताना, माझ्यासोबत ही घटना घडली. मी कोऑपरेट करत काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला होणारा शारिरीक व अश्लील छळ मर्यादेपलिकडे गेला. त्यामुळे, मला मल्याळ फिल्म इंडस्ट्री (Film industry) सोडून चेन्नईला शिफ्ट होण्यासाठी मजबूर व्हावे लागले. या शोषणाविरुद्ध मी आर्टीकलच्या माध्यमातून आवाज उठवला होता. मी जे काही भोगलंय, आणि सहन केलंय. त्याविरुद्ध मी न्यायाची मागणी करत आहेत. सिनेइंडस्ट्रीतील या वरिष्ठांच्या करतुदीविरुद्ध मी मदतीची मागणी करत आहे, असेही मीनू मुनीर (Actress) यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती देखील मीनू यांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारावर भाष्य केलंय. चित्रपटाची शुटींग करताना मला वाईट अनुभव आले, मी टॉयलेटला गेले होते, तिथून बाहेर येताच मला जयसूर्याने पाठिमागून पकडले. त्यानंतर, मला न विचारताच माझ्यासोबत किसही केला. अचानक झालेला हा प्रकार पाहून मी अचंबित झाले, तसेच तेथून पळून गेले. विशेष म्हणजे अभिनेत्याने मला कामाची देखील ऑफर दिली होती, पण त्यासाठी त्याच्यासोबत राहावे लागणार होते, असा खळबळजनक दावाही अभिनेत्रीने केला आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीचं खूप शोषण केलं जातंय, मी त्याची साक्षीदार आणि पीडित आहे. मी जेव्हा चेन्नईला स्थलांतर केलं, त्यावेळी कुणीही मला साधी विचारपूसही केली नाही. तू शिफ्ट होण्याचं नेमकं कारण काय, किंवा इतरही विचारपूस मला इंडस्ट्रीतून करण्यात आली नाही, असे म्हणत मीनूने इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणावर भाष्य केलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री रेवती हिनेही अभिनेता सिद्दीकीवर गंभीर आरोप केले होते. सिद्दिकीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप रेवतीने केला होता. त्यानंतर, आता मीनू मुनीरने 2013 सालच्या घटनांचा उल्लेख करत इंडस्ट्रीतील लॉबिंग आणि लैंगिक छळाची बाब समोर आणली आहे.
हेही वाचा
गौतमीला खुन्नस देणाऱ्या राधाच्या अदा, मुंबईकर फिदा; कोण आहे घायाळ करणारी नृत्यांगणा?