Jeetendra Birthday : बॉलिवूड अभिनेते जितेंद्र (Jeetendra) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. जितेंद्र यांनी आपल्या उत्कृष्ट नृत्यशैलीने बॉलिवूडमध्ये वेगळी छाप सोडली आहे. चित्रपटांच्या माध्यमातूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. जितेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 रोजी अमृतसर येथे झाला. अभिनेते आज त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 60 ते 90च्या दशकापर्यंत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. बॉलिवूडच्य सर्व कलाकारांची स्वतःची खासियत असते. जितेंद्र यांची खासियत म्हणजे त्यांचे पांढरे कपडे.
ऑनस्क्रीन ते ऑफस्क्रीनपर्यंत पांढरे कपडे हे जितेंद्र यांचे स्टाईल स्टेटमेंट बनले. अनेक चित्रपटांमध्ये ते पांढरी पँट, पांढरा शर्ट आणि अगदी पांढरे शूज परिधान करताना दिसले आहेत. आजही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना ते पांढऱ्या कपड्यांमध्येच दिसतात. त्यांना पांढरा रंग इतका का आवडतो, असा प्रश्न त्यांच्या प्रत्येक चाहत्याला पडला असणारच...
पांढरा रंग निवडण्याचं कारण...
एका कार्यक्रमात जितेंद्र यांना हा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, जेव्हा ते अभिनेता बनले तेव्हा बॉलिवूडमध्ये फॅशन डिझायनर्स ही संकल्पना नव्हती, म्हणूनच जितेंद्र स्वतःला आवडेल ते परिधान करायचे. रंगीत कपड्यांमध्ये आपण ठेंगू आणि लहान दिसतो, तर हलक्या रंगाच्या कपड्यांमध्ये आपण उंच दिसतो, असेही जितेंद्र यांना वाटायचे. यामुळेच ते पांढरे कपडे घालायला लागले.
जितेंद्र यांनी आपल्या करिअरमध्ये ‘हिम्मतवाला’, ‘तोहफा’, ‘जुदाई’, ‘नागिन’, ‘हातिम’ यासह अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. जितेंद्र हे अभिनेता आणि निर्माताही आहे. ते बालाजी टेलिफिल्म्स, बालाजी मोशन पिक्चर, ऑल्ट बालाजीचे दिग्दर्शक देखील आहेत. जितेंद्र हे टीव्ही क्वीन एकता कपूर आणि अभिनेता तुषार कपूर यांचे वडीलही आहेत.
हेही वाचा :
- Aathva Rang Premacha : सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरू, 'आठवा रंग प्रेमाचा' लवकरच होणार प्रदर्शित
- Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha