Hanuman Director : दाक्षिणात्य सिनेमा हनुमानची (Hanuman) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हनुमान सूर्याला खायला गेल्यानंतर पुढे कशा प्रकारच्या घटना घडतात.  हे आपण लहानपणापासून सिनेमा, कथांच्या माध्यमातून पाहात आलो आहोत. दाक्षिणात्य सिनेमा हनुमानमध्ये हिच स्टोरी काल्पनिक स्वरुपमात मांडण्यात आली आहे. सिनेमा अतिशय कमी बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. सिनेमातील व्हिज्युअल्समुळे प्रेक्षकांची सिनेमाला तुफान पसंती मिळताना दिसत आहेत. दरम्यान हुनमानचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी खळबळजक दावे केले आहेत. 


काय म्हणाला हनुमानचा (Hanuman) दिग्दर्शक?


सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर प्रशांत वर्माने सिनेमाबाबत एक ट्वीट केले आहे. प्रशांत शर्मीने (Prashant Sharma) ट्वीटरवर लिहिले की, "आमच्या टीमविरोधात प्रपोगंडा सुरु आहे. हा प्रपोगंड्याचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक प्रोफाईल बनवण्यात आले आहेत. अस वाटतय की कालच्या भोगीच्या आगीत डिजीटल स्वरुपात घाण पसरवण्याचे काम सुरु आहे" 


'हनुमानची (Hanuman) पतंग नकारात्मकतेला मागे टाकत भरारी घेण्यास सज्ज'


"मी या काळात आम्हाला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानतो. या चाहत्यांनी आम्हाला विश्वास दिला की, धर्मासोबत उभे राहिलो की, विजय निश्चितपणे होतोच. या सक्रांतीला हनुमानची पतंग नकारात्मकतेला मागे टाकत भरारी घेण्यास सज्ज आहे.", असे हनुमानचे दिग्दर्शक प्रशांत शर्मा म्हणाले.  


हनुमान सिनेमाचे तेलगू वर्जन तुफान कमाई करत आहे. दरम्यान आता हनुमान हिंदीमध्येही बंप्पर कमाई करताना दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात हनुमानने 12 कोटींचा टप्पा पार केलाय. दरम्यान, सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत शर्मा यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. 


हनुमान (Hanuman) सिनेमाबाबत नेमकं काय सुरु आहे?


प्रशांत शर्मा (Prashant Sharma) यांचा हनुमान हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा इतर अनेक सिनेमेही रिलीज झाले. तेलगू इंडस्ट्रीचा (Tollywood) सुपरस्टार महेश बाबू याचा सिनेमाही याच दरम्यान रिलीज झाला. गुंटूर कारम असे या सिनेमाचे नाव आहे. याशिवाय धुनषचा 'कॅप्टन मिलर' आणि शिवा कार्तिकेयनचा 'एलान' हा सिनेमाही हनुमान समवेत रिलीज झाला होता. त्यानंतर विजय सेथूपती आणि कटरिना कैफ यांची मुख्य  भूमिका असलेला मेरी क्रिसमस हा सिनेमाही काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. त्यामुळे लोकांचा तुफान प्रतिसाद असूनही हुनमानला सिनेमागृह मिळू शकलेले नाहीत. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Pushpa 2 OTT Release: ठरलं! थिएटरनंतर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा-2'