Prasanth Varma : "मी सध्या बॉलिवूडच्या ऑफर्सपासून दूर राहतोय. मी माझ्या पुढील सिनेमावर लक्ष केंद्रीत करु इच्छित आहे. मी मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याच्या विरोधात नाही. मात्र, मोठ्या स्टार्ससोबत काम करण्यासाठी बराच वेळ जातो. मी मोठ्या स्टार्सची वाट पाहत बराच वेळ वाया घातलाय. त्यानंतर मी निर्णय घेतले", असे हनुमान सिनेमाचा दिग्दर्शक प्रशांत वर्मा म्हणाला. सिद्धार्थ कन्नन याच्याशी बातचीत करत असताना प्रशांत वर्माने हा खुलासा केलाय.
हनुमान सिनेमाची बंप्पर कमाई
अभिनेता तेजा सज्जाच्या हनुमान या सिनेमाला सध्या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. दिग्दर्शक प्रशांत शर्मा या सिनेमाला मिळालेले यश सध्या इंजॉय करतोय. हनुमान सिनेमामुळे प्रशांत वर्माला वेगळी ओळख निर्माण करता आली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
हनुमानचा सिक्वेलही येणार
हनुमान सिनेमात तेजा सज्जा याच्याशिवाय अमृत्ता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार आणि विनय रॉय यांसारखे कलाकारही दिसले आहेत. तर याच सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. हनुमानचे सिक्वेलचे 'जय हनुमान' हे नाव असणार आहे. हनुमानच्या सिक्वेलबाबतही चाहते उत्सुक आहेत. या दरम्यान दिग्दर्शकाने दिलेल्या मुलाखतीमुळे सिनेमा चर्चेत आला आहे. हनुमान सिनेमासाठी राम चरण, अल्लू अर्जून आणि ज्युनिअर एनटीआर यांसारख्या मोठ्या कलाकारा ऑफर देण्यात आली होती. मात्र, हाती काहीच लागले नाही, असा खुलासा हनुमान सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी केला आहे.
हनुमानविरोधात प्रपोगंडा सुरु असल्याचे दिग्दर्शकाने केले होते आरोप
प्रशांत शर्मा (Prashant Sharma) यांचा हनुमान हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा इतर अनेक सिनेमेही रिलीज होते. तेलगू इंडस्ट्रीचा (Tollywood) सुपरस्टार महेश बाबू याचा सिनेमाही याच दरम्यान रिलीज झाला होता. गुंटूर कारम असे या सिनेमाचे नाव आहे. याशिवाय धुनषचा 'कॅप्टन मिलर' आणि शिवा कार्तिकेयनचा 'एलान' हा सिनेमाही हनुमान समवेत रिलीज झाला होता. त्यानंतर विजय सेथूपती आणि कटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला मेरी क्रिसमस हा सिनेमाही काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. त्यामुळे लोकांचा तुफान प्रतिसाद असूनही हुनमानला सिनेमागृह मिळू शकलेले नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या
Animal Ott Release: रणबीर कपूरचा 'ॲनिमल' ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर नेटकरी नाराज; नेमकं कारण काय?