Gullak Season 3: आजच्या काळात प्रेक्षकांच्या आवडीनुसार ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज आहेत. यावर प्रेक्षकांना अॅक्शनपासून क्राईम आणि कॉमेडीपर्यंत सर्व काही पाहायला मिळते. OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक वेब सिरीज पाहायला मिळतील, पण त्यातली 'गुल्लक' (Gullak) ही वेब सिरीज अनेक प्रकारे वेगळी ठरते. ही सिरीज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत बसून पाहू शकता. 'गुल्लक'मधील कलाकारांनी एका कुटुंबाची परिस्थिती उत्तम प्रकारे मांडली आहे.


‘गुल्लक’ या सिरीजचे दोन सीझन आले आहेत, जे प्रेक्षकांना खूप आवडले होते आणि आता पुन्हा एकदा सर्वांना गुदगुल्या करण्यासाठी आणि पोटभरून हसवण्यासाठी ‘गुल्लक सीझन 3’देखील (Gullak Season 3) प्रदर्शित होणार आहे.


प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट


गेल्या दोन सीझनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर मिश्रा कुटुंब पुन्हा नवीन सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेत एका मध्यमवर्गीय कुटुंबातील बिघडत चाललेली नाती आणि त्यांचा त्रास अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने चित्रित केला आहे, जो तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतो.


पलाश वासवानी दिग्दर्शित केलेली ‘गुल्लक’ ही वेब सिरीज एक मजेदार कौटुंबिक कॉमेडी आहे, ज्यामध्ये जीवनातील प्रत्येक त्रासही एक कथा म्हणून सादर करण्यात आली आहे. यात जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता, हर्ष मैयार आणि सुनीता राजवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


‘या’ दिवशी रिलीज होणारा ‘गुल्लक’चा सीझन 3


या वेब सिरीजचा ट्रेलर निर्मात्यांनी आधीच रिलीज केला होता, जो चाहत्यांना खूप आवडला आहे आणि आता ‘गुल्लक सीझन 3’ देखील रिलीज होणार आहे. कॉमेडीचा डोस देणारा ‘गुल्लक’ सीझन 3, 07 एप्रिल 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर रिलीज होणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha