Govinda Love Life Before Marriage With Wife Sunita Ahuja: बॉलिवूडचा (Bollywood News) 'हिरो नंबर 1' गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांमधले मतभेद प्रचंड वाढले असून आता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा (Bollywood Actor Govinda) आणि पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण, त्यावेळी पत्नी सुनीता अहुजानं अनेकदा मीडियासमोर येऊन या चर्चा फेटाळून लावल्या. कोई माई का लाल, हमे अलग नही कर सकता, असंही सुनीता अहुजा म्हणाल्या. पण, आता पुन्हा एकदा घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा दोघेही घटस्फोट घेणार आहेत, या चर्चांनी जोर धरलेला. अशातच गोविंदाच्या वकिलांनी घटस्फोटाच्या बातम्यांचं खंडन केलं आहे. तसेच, प्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी टीव्ही 9 सोबत बोलताना, गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेऊच शकत नाहीत, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
वकील आणि पहलाज निहलानी यांच्या वक्तव्यानंतर, गोविंदाच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, प्रत्येक जोडप्याप्रमाणे, गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात चढ-उतार आले आहेत. एक काळ असा होता की, जेव्हा गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न झालेलं, तेव्हाही अभिनेता एका अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता आणि त्यानं अभिनेत्रीशी लग्न करण्यासाठी सुनीतासोबतचा आपला विवाह मोडलेला.
कोणाच्या प्रेमात वेडा झालेला गोविंदा?
गोविंदा ज्या अभिनेत्रीवर प्रेम करत होता, त्या अभिनेत्रीबद्दल सर्वांना माहिती आहे. गोविंदा त्याच्या बॉलीवूड कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्री नीलम कोठारीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानं स्वतः 1990 मध्ये स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हे कबूल केलेलं. गोविंदानं म्हटलेलं की, "मी तिला (नीलम कोठारी) जितकं जास्त ओळखत गेलो, तितकीच मला ती आवडू लागली. ती अशी महिला होती, जिच्यावर कोणताही पुरुष अगदी सहज भाळू शकतो. मी माझं मन गमावलेलं..."
नीलमशी लग्न करण्यासाठी सुनीतासोबत लग्न मोडलेलं...
जेव्हा गोविंदानं सुनीतासोबत लग्न केलं, तेव्हा तो नीलमसोबतही रिलेशनशिपमध्ये होता. त्यानं त्यावेळी नीलमपासून आपलं लग्न ठरल्याची बाब गुप्त ठेवलेली. नंतर, अभिनेत्यानं नीलमशी लग्न करण्यासाठी सुनीतासोबतचं लग्न मोडलेलं. पण, नंतर काही कारणानं त्याचं आणि नीलमचं नातं संपुष्टात आलं आणि त्यानंतर गोविंदा आणि सुनीतानं लग्न केलं.
1987 मध्ये झालेल गोविंदा आणि सुनीताचं लग्न
गोविंदानं नंतर सुनीताशी लग्न केलं आणि तिच्यासोबत आपला संसार थाटला. दोघांच्या लग्नाला आज 38 वर्ष झालीत. दोघांचंही लग्न 1987 मध्ये झालेलं. आता दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. या जोडप्याला एक मुलगी टीना आहुजा आणि एक मुलगा यशवर्धन आहुजा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :