Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना इंडस्ट्रीत आपलं नाव मोठं करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. कधी यांना दिग्दर्शक, निर्मात्यांनी डावललं, तर कधी यांना यांच्यासोबतच्या अभिनेत्री, अभिनेत्यांनी डावलंलं. पण, तरीसुद्धा आपल्या जिद्दीच्या जोरावर यांनी यशाचं सर्वोच्च शिखर गाठलंच. असाच हरहुन्नरी अभिनेता म्हणजे, मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty).

कधीकाळचे सुपरस्टार राजकुमार यांनी या अभिनेत्याला असंही म्हटलेलं की, कसे कसे लोक येतात सेलिब्रिटी बनण्यासाठी. पण, मिथुन यांच्यासाठी हा संघर्ष इथेच संपला नव्हता. त्यांना तर त्यांच्या त्वचेच्या रंगावरुनही खूप ऐकायला लागलं होतं. 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले मिथुन चक्रवर्ती त्यांच्या अगदी सर्वसामान्य लूकमुळे सर्वसामान्यांचे सुपरस्टार बनले. एक काळ होता, जेव्हा मिथुन त्यांच्या रंगावरच्या कमेंट्स ऐकून खूप रडायचे.  अलिकडेच झालेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की, जर त्यावेळी एका दिग्गज अभिनेत्रीनं त्यांना साथ दिली नसती, तर ते आज बॉलिवूड स्टार बनले नसते. 

त्याकाळी 'या' सुपरस्टारसोबत काम करायला अभिनेत्री थेट नकार द्यायच्या... 

1979 मध्ये 'मृगया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मिथुन चक्रवर्तीला त्याच्या पहिल्याच चित्रपटानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तरीही, त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हतं. याबाबत बोलताना अभिनेत्यानं सांगितलं की, "कोणतीही मोठी अभिनेत्री माझ्यासोबत काम करू इच्छित नव्हती, सर्वांना वाटायचं की, मी एक छोटा अभिनेता आहे, मी कधीही मोठा स्टार होऊ शकणार नाही, माझ्याबद्दल खूप काही बोललं जात होतं, या सर्व गोष्टी आठवून मला अजूनही वाईट वाटतं, मला अनेक चित्रपटांमध्ये घेतलं गेलं नाही, कारण माझा त्वचेचा रंग इतर स्टार्सपेक्षा जास्त गडद होता, परंतु मला यातून बाहेर पडून,सुपरस्टारचा किताब मिळवून देण्यासाठी ज्या अभिनेत्रीनं मला साथ दिली, ती दुसरी-तिसरी कोणी नसून झीनत अमान (Zeenat Aman) होती..." 

झीनत अमानसोबतचा सिनेमा हिट नाही, सुपरहिट ठरलेला... 

मिथुन यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, "झीनत अमाननं माझ्यासोबत काम करण्यास अजिबात नकार दिला नाही, झीनत जीनं मला पाहिलं आणि सांगितलं की, मी चांगला दिसतो आणि माझ्यासोबत काम केलं...'. 1982 मध्ये मिथुन चक्रवर्तीनं 'डिस्को डान्सर' हा चित्रपट केला, जो त्या काळातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटानं मिथुनसाठी सिनेसृष्टीची दारं उघडली. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 6 कोटी रुपये आणि परदेशात 95 कोटी रुपये कमावले. मिथुनचा डिस्को डान्सर हा चित्रपट भारतीय चित्रपट उद्योगातील देशातील पहिला 100 कोटींचा चित्रपट ठरला. मिथुन अजूनही चित्रपट उद्योगात सक्रिय आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आमदाराची लेक हिरोईन बनली, पण तिच्यामुळे दोन सुपरस्टार भावांमध्ये हाडवैर निर्माण झालं, 18 वर्षांपासून दोघांमध्ये अबोला