Actor Govinda affair with a 30 year old Marathi actress : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा हिने बांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. गोविंदाचं 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी अफेअर असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली होती. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता यांनी हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम 13 (1) (i), (ia), आणि (ib) अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात व्यभिचार (Adultery), क्रूरता (Cruelty) आणि परित्याग (Desertion) या बाबी घटस्फोट मिळावा, यासाठी नमूद करण्यात आल्या आहेत. 

Continues below advertisement

बांद्रा येथील न्यायालयाने कथितरीत्या गोविंदाला 25 मे रोजी समन्स पाठवले होते. मात्र अभिनेता अद्याप कोणत्याही कार्यवाहीत व्यक्तिगत हजर राहिला नाही. ज्यामुळे कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान, सुनीता मात्र जून 2025 पासून न्यायालयीन सुनावणी व सर्व कार्यवाहीस उपस्थित राहिल्या आहेत.

गोविंदाची एकूण संपत्ती किती?

गोविंदाची संपत्ती सुमारे ₹150–170 कोटी एवढी असल्याचा अंदाज आहे. यात जूहूतील ₹16 कोटीपेक्षा अधिक किमतीचा ‘जलदर्शन’ हा बंगला, तसेच मुंबईतील (रुईया पार्क, मड आयलंड), कोलकाता, रायगड आणि लखनऊ येथील फार्महाऊस/फ्लॅट्सचा समावेश आहे.

Continues below advertisement

घटस्फोटात गोविंदाला किती रक्कम द्यावी लागेल?

कायद्यात ठराविक निश्चित रक्कम नसते. पत्नीला पोटगीचा हक्क असतो. तो खालील काही घटकांवर अवलंबून असतो – 

  1. पतीचे उत्पन्न व संपत्ती
  2. पत्नीची आर्थिक स्थिती (नोकरी, कमाई, मालमत्ता)
  3. विवाहाचा कालावधी (गोविंदा–सुनीता यांचा विवाह 1987 पासून म्हणजेच खूप मोठा कालावधी)
  4. वैवाहिक जीवनातील जीवनमान

मुलं/कौटुंबिक जबाबदाऱ्या

पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांनुसार, पतीच्या निव्वळ उत्पन्नाच्या 25 टक्क्यांपर्यंत रक्कम पत्नीला पोटगी म्हणून मिळू शकते. पत्नीची स्वतःची चांगली कमाई असल्यास ही रक्कम कमी होऊ शकते. त्यामुळे गोविंदाला किती रक्कम द्यावी लागेल हे न्यायालय ठरवेल. कायदेतज्ज्ञांच्या मते, अंदाजे ₹35 ते 40 कोटी रुपयांपर्यंत गोविंदाला पत्नीला द्यावे लागू शकते.

सुनीता आहूजांची याचिका नेमकी कशावर आधारित?

13 (1) (i) – व्यभिचार (Adultery): पती/पत्नीने विवाहानंतर इतर कुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास पती/पत्नीने घटस्फोट मागू शकतात.

13 (1) (ia) – क्रूरता (Cruelty): पती/पत्नीने मानसिक किंवा शारीरिक त्रास दिल्यास हा घटस्फोटाचा आधार ठरतो.

13 (1) (ib) – परित्याग (Desertion): पती/पत्नीने किमान 2 वर्षे कोणतेही वैध कारण नसताना सोडून दिल्यास पती/पत्नी घटस्फोट मागू शकतात.

 

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shubman Gill News : आशिया कपच्या निवडीनंतर काही दिवसात शुभमन गिल मोठ्या स्पर्धेतून बाहेर, 'या' खेळाडूच्या गळ्यात आता संघाची धुरा

Jolly LLB 3 प्रदर्शित होण्यापूर्वीच संकटात सापडला, अक्षय कुमार अन् अर्शद वारसीला पुणे कोर्टाचं समन्स