Govinda and Sunita Ahuja Daughter: गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) दोघेही सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोघेही प्रसारमाध्यमांसमोर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सुनीताने गोविंदावर गंभीर आरोप केले आहेत. तिने गोविंदाचे को-अॅक्ट्रेस (Entertainment) कोमल रानीसोबत अफेअर असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर गोविंदानेही व्हिडीओ शेअर करुन पलटवार केला. तसेच आपल्या पत्नीला, मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. दरम्यान, गोविंदा आणि सुनीताच्या आयुष्यात यापूर्वी एक दु:खद घटना घडली होती. दोघांच्या आयुष्यातील एक भावुक (Daughter Death) किस्सा समोर आला आहे.
एकमेकांशी चांगली ओळख निर्माण केल्यानंतर गोविंदा आणि सुनीता या दोघांनीही 1987 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर त्यांना एका दु:खद प्रसंगाचा सामना करावा लागला. 1989 साली गोविंदा आणि सुनीता यांनी टीनाला जन्म दिला. 1997 साली या जोडप्याने यशवर्धनला जन्म दिला. दरम्यान, दोन्ही मुलांच्या मध्ये सुनीताला एक मुलगी देखील झाली होती. पण दुर्देवाने गोविंदा आणि सुनीताच्या मुलीचा मृत्यू झाला.
तीन महिन्यांतच मुलीचा झाला मृत्यू (Govinda and Sunita Ahujas Heart breaking Past They Lost Their Baby)
टीनाच्या जन्मानंतर सुनीता आणि गोविंदाला एक मुलगी झाली होती. पण त्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्या मुलीचे फुफ्फुस पूर्णपणे तयार झाले नव्हते. तीन महिन्यांतच गोविंदा आणि सुनीता यांच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर दोघेही पूर्णपणे खचले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दु:खातून सावरण्यासाठी त्यांना बरीच वर्ष लागली. शेवटी त्यांना या दु:खातून बाहेर येण्यासाठी त्यांना हिंमत मिळाली. काही वर्षांनंतर सुनीताने यशवर्धनला जन्म दिला.
एका जुन्या व्हिडीओत, गोविंदाने हा दु:खद अनुभव शेअर केला. गोविंदाच्या आईंनी त्याच्या मृत मुलीला नर्मदा नदीमध्ये विसर्जित करण्यास सांगितले होते. आपल्या निष्प्राण मुलीला स्वत: घेऊन जाणं, हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी अनुभवांपैकी एक होता. अभिनेत्याने सांगितलं की, नवरात्रिच्या नवव्या दिवशी गोविंदा आपल्या लेकीला नदीच्या काठावर घेऊन जात होते. वाटेत त्यांना कडेवर बाळाला घेऊन भीक मागणारी एक महिला भेटली. गोविंदाच्या कडेवरचे निष्प्राण बाळ पाहताच ती महिला लगेच निघून गेली.
गोविंदा म्हणाला की, 'त्यावेळी ती महिला आपल्या लेकराला घेऊन पळून गेली. मला त्या वेळेस वाटलं की, मी एक भिकारी आहे आणि ती माझी मालकीण आहे. हेच आयुष्य आहे. तुम्हाला प्रसिद्धीच्या शिखरावरही असताना तुम्हाला भिकाऱ्यापेक्षाही वाईट गोष्ट दाखवते', असं गोविंदा म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
