Mystery Thriller Movie on Amazon Prime Video: नेटफ्लिक्सपासून (Netflix) प्राईम व्हिडीओपर्यंत, आजकाल वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट-वेब सीरिज वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जबरदस्त मिस्ट्री-थ्रिलर चित्रपटाबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये पहिल्याच मिनिटापासून सस्पेन्स सुरू होतो. हा जबरदस्त चित्रपट 2024 च्या सुरुवातीला थिएटरमध्ये दाखल झालेला आणि आता OTT वर देखील उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्ही थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला नसेल तर, सस्पेन्स थ्रीलर मूव्ही अजिबात चुकवू नका. अॅमेझॉन प्राईमवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. आम्ही ज्या चित्रपटाबाबत तुम्हाला सांगतोय, त्याचं नाव 'गोलम' (Golam Mystery Thriller). 


2024 च्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट 


2024 च्या सुरुवातीला रिलीज झालेला 'गोलम' हा मल्याळम भाषेतील सर्वोत्तम मिस्ट्री-थ्रिलर्सपैकी एक आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे, पहिल्या मिनिटांपासूनच सस्पेन्स आणि थ्रील सुरू होतो आणि पुढच्या एका तासातच चित्रपटाची संपूर्ण कथाच उलटल्यासारखं वाटतं. हा चित्रपट एकदा बघायला सुरुवात केली की, क्लायमॅक्सपर्यंत तुमची पापणीही पडणार नाही, एवढा हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो.


एका हत्येपासून सुरू होते फिल्मची कहाणी 


'गोलम'ची कथा एका खुनानं सुरू होते. या हत्येचा तपास करणाऱ्यांना 13 जणांवर संशय आहे. या 2 तास 42 मिनिटांच्या चित्रपटाचा सस्पेन्स आणि कथा अजय देवगण स्टारर 'दृश्यम' पेक्षा कमी नाही, पण तरीसुद्धा दोन्ही चित्रपटांच्या कथांमध्ये खूप फरक आहे. हत्येनंतर, गोलमच्या कथेत अनेक ट्विस्ट आणि टर्न येतात शेवटी एक असा खुलासा होतो, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. 


वॉशरूममध्ये बॉसचा खून या चित्रपटात रंजीत सजीव, श्रीकांत मुरली, सिद्दीक, कार्तिक शंकर यांसारखे स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा एका आयटी ऑफिसभोवती फिरते, जिथे सुमारे 15 लोक काम करतात. रोजच्या प्रमाणेच एक दिवस बॉस ऑफिसला येतो, काही वेळानं तो वॉशरूमला जातो. बॉस बराच वेळ वॉशरूममधून बाहेर पडत नाही. अशा परिस्थितीत कर्मचारी वॉशरूमचा दरवाजा ठोठावतात. आतून आवाज येत नाही. त्यानंतर घाबरलेले कर्मचारी दुसऱ्या चावीनं दरवाजा उघडतात आणि आतील दृश्य पाहून पुरते हादरतात. आत त्यांच्या बॉसचा मृतदेह पडलेला दिसतो. यानंतर चित्रपटाची खरी कहाणी सुरू होते.


कुठे पाहाल 'गोलम'? 


'गोलम'मध्ये रंजीत सजीव (Ranjith Sajeev) यानं एएसपी संदीप कृष्णाची भूमिका साकारली आहे. ज्यांना या खून प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. संदीप हत्येच्या गूढाचा तपास सुरू करतो आणि सर्व संशयितांना एक एक करून प्रश्न विचारतो. पण तासाभरानंतर चित्रपटाची संपूर्ण कथा बदलून जाते. जसजशी कथा पुढे सरकते, तसतशी ती आणखी रंजक होत जाते. चित्रपटाचे दिग्दर्शक समजद असून त्याची कथा प्रवीण विश्वनाथ आणि समजद या दोघांनीही लिहिली आहे. या चित्रपटाची खरी ताकद आहे त्याची कथा, जी अतिशय साधी आणि रोमांचक आहे. तुम्ही OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर हा मिस्ट्री-थ्रिलर पाहू शकता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :