Girija Oak Narrates Insolence Local Train: मराठी इंडस्ट्रीत (Marathi Industry) कित्येक वर्ष काम करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीनं (Marathi Actress) एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि सर्वांचीच मनं जिंकली. बघता बघता ही अभिनेत्री थेट नॅशनल क्रश (National Crush) बनली. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, ती दुसरी-तिसरी कुणी नसून मराठी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak). 'तारे जमीन पर', 'शोर इन द सिटी' आणि 'जवान' यांसारख्या फिल्म्समध्ये आपल्या उत्तम अभिनयानं स्वतःची छाप सोडणारी गिरीजा सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. तिचा साधेपणा आणि सौंदर्यानं प्रभावित होऊन चाहते तिला 'नॅशनल क्रश' म्हणू लागले. ज्या मुलाखतीमुळे गिरीजा व्हायरल झाली, त्याच मुलाखतीत गिरीजा ओकनं तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला.
गिरीजा ओकनं नुकतीच 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिलेली. या मुलाखतीत बोलताना गिरीजा ओकनं तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेबाबत सांगितलं. गिरीजा ओक म्हणाली की, "लोकल ट्रेनमध्ये लोक तुम्हाला धक्का देऊन, स्पर्श करुन निघून जातात... कधीकधी तर जाणूनबुझून तुमच्यावर येऊन आदळतात. हे फार विचित्र आणि धक्कादायक असलं तरीसुद्धा आता हे अगदी नॉर्मल झालंय... जेव्हा एका मुलानं माझ्यासोबत गैरवर्तन केलं, त्यावेळी मला काही जाणवलं नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला मला माहीत नव्हतं की, तो कुठून आलाय... असू शकतं की, तो एखाद्या बाजूनं आलेला असावा..."
गिरीजा ओक पुढे बोलताना म्हणाली की, "त्यानं त्याचं बोट माझ्या पाठीवर फिरवलं, मग माझ्या मानेपासून, माझ्या पाठीपर्यंत आणि मग गर्रकन फिरला... जोपर्यंत मला कळेल की, नेमकं काय झालंय, तोपर्यंत तो मुलगा गायब झालेला... मी त्याला ओळखूच शकले नाही... ना मला त्याच्याबाबत काही माहीत होतं..."
एकाच्या थोबाडीत मारलेली...
गिरीजानं यावेळी बोलताना आपल्या शाळेच्या दिवसातल्या काही गोष्टींबाबत सांगितलं. गिरीजानं बोलताना सांगितलं की, "शाळेत एक मुलगा मला खूप त्रास द्यायचा. त्यावेळी मी त्याला थोबाडीत मारलेली. याच अनुभवानं मला स्वतःसाठी उभं राहायला शिकवलं. त्यानंतर तिनं सांगितलं की, "तिच्या कुटुंबातील महिलांनी खासकरुन तिच्या आईनं तिला मोटिवेट केलं..."
"आई आणि बहिणीनं धीट राहायला शिकवलं"
गिरीजा ओकनं सांगितलं की, "मी खरंच स्वतःला खूप नशीबवान आहे. माझी दीदी, माझी आई... ज्या सर्व महिलांसोबत मी वाढले, ज्यांनी माझा सांभाळ केला, त्या सर्वांनी मला नेहमी धीटपणे वागायला शिकवलं. तेदेखील शांतपणे नाही, तर मोकळेपणानं आणि निश्चयानं. मी लहान असताना माझ्या आईला धीटपणे वागताना पाहिलंय. जर तिला कुणी जाणूनबुजून धक्का देत असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं तिच्या पुढे जात असेल तर, ती न घाबरता बोलायची."
दरम्यान, गिरीजा ओकच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी फार कमी वयातच 'गोष्ट छोटी डोंगरावधी', 'गुलमोहर', 'मानिनी' आणि 'अडगुले मडगुले' यांसारख्या मराठी फिल्म्सपासून सुरुवात केलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :