Ranveer Singh Dhurandhar: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. रणबीर कपूरच्या ‘रामायण’प्रमाणेच हा चित्रपटही दोन पार्टमध्ये रिलीज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच चाहत्यांना डिसेंबरमध्ये या चित्रपटाचा पहिला पार्ट पाहायला मिळू शकतो आणि पुढील वर्षी दुसरा पार्ट रिलीज होऊ शकतो, अशी चर्चा आहे. (Bollywood)
रणवीर सिंहचे चाहते ‘धुरंधर’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा शेवटचा लीड रोल ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (2023) मध्ये होता. 2024 मध्ये ‘सिंघम अगेन’मध्येही त्याची झलक म्हणून दिसला होता. दोन वर्षांपासून रणवीर मोठ्या पडद्यावर हिरो म्हणून दूर आहे. त्यामुळे ‘धुरंधर’चा टीजर आल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यातही रणवीरचा कधीही न पाहिलेला जबरदस्त आणि बेधडक अवतार पाहायला मिळत आहे. डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटात कदाचित प्रेक्षकांना सध्या पहिलाच पार्ट पाहायला मिळेल. असं सांगण्यात येत आहे.
धुरंधर दोन भागांमध्ये होणार रिलीज?
‘बॉलीवुड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, ‘रामायण’प्रमाणेच ‘धुरंधर’ही दोन पार्टमध्ये रिलीज होऊ शकते. एका सूत्राने सांगितलं, “धुरंधर दोन भागांची कथा आहे. त्यामुळे 5 डिसेंबरला रिलीज होणारा भाग हा पहिला पार्ट असेल. हा एका महत्त्वाच्या टप्प्यावर संपेल आणि पुढची कथा दुसऱ्या भागात पुढे जाईल. विशेषत: ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं’ अशा सस्पेन्स असेल तर पुढच्या पार्टसाठीची उत्सुकता आणखी वाढेल.” “दिग्दर्शक आदित्य धरने खूप मोठ्या प्रमाणात शूटिंग केलं आहे. पण फुटेज खूप लांब असल्यामुळे त्यांनी कथा दोन भागांत विभागण्याचा विचार केला आहे. जर हीच प्लॅनिंग कायम राहिली तर ‘धुरंधर’चा दुसरा पार्ट पुढील वर्षी येईल. असे सांगितले जात आहे.
‘धुरंधर’चा ट्रेलर कधी?
चित्रपटाचा ट्रेलर 18 नोव्हेंबर, म्हणजे आज रिलीज होणार आहे. ही एक स्पाय अॅक्शन थ्रिलर फिल्म आहे, ज्याचं लेखन आणि दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. यात रणवीर सिंहसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर सारा अर्जुन आणि राकेश बेदी सपोर्टिंग रोलमध्ये झळकणार आहेत.
‘धुरंधर’चा टायटल ट्रॅक झाला रिलीज
टीझरनंतरच या चित्रपटाबद्दलचा उत्साह वाढला होता. रणवीर सिंहचा खतरनाक लुक पाहून चाहत्यांचे अंगावर काटा आला होता. आज मेकर्सनी याचा टायटल ट्रॅक सादर केला आहे. हा ट्रॅक 1995 मधील मूळ पंजाबी गाणं ‘ना दिल दे परदेसी नू (जोगी)’ चं मॉडर्न वर्जन आहे. ओरिजनल गाणं मोहम्मद सादिक आणि रंजीत कौर यांनी गायले होते. नव्या आवृत्तीत हनुमानकाइंड, जैस्मिन सॅंडलस, सुधीर यदुवंशी आणि शाश्वत सचदेव यांनी आवाज दिला आहे. संगीत शाश्वत सचदेव आणि चरणजीत आहूजा यांचं असून बोल बाबू सिंह मान यांनी लिहिले आहेत.