Sanjay Dutt as Afzal Khan: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित "राजा शिवाजी" (Raja Shivaji movie) या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख रितेश देशमुखने जाहीर केली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाची तयारी जोरदार सुरू असल्याचंही दिसून येत आहे. अशातच या चित्रपटातील अभिनेता संजय दत्तचा अफजल खानच्या भूमिकेतील एका लूकचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावरती चर्चेत आला आहे, संजय दत्त (Sanjay Dutt) अफजल खानच्या भूमिकेत दिसत आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटातील हा एक शक्तिशाली लूक पिंक व्हिलाने त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Continues below advertisement

Sanjay Dutt as Afzal Khan: संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित "राजा शिवाजी" या चित्रपटामध्ये संजय दत्त अफजलखानाची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शिक रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जेनेलिया देशमुख यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. 1 मे 2026 रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Raja Shivaji: हा चित्रपट 1 मे 2026 रोजी अनेक भाषांमध्ये होणार प्रदर्शित 

रितेश देशमुखच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच रितेश देशमुखने या चित्रपटाबाबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत, हा चित्रपट 1 मे 2026 रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता रितेश देशमुख म्हणाला, 'छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीयेत, तर ते लाखो लोकांच्या हृदयात असलेली एक भावना आहेत. त्यांच्या असामान्य कथेचा एक भाग सांगता येणे हा एक सन्मान आणि मोठी जबाबदारी दोन्ही आहे. या दृष्टिकोनावर विश्वास ठेवल्याबद्दल मी ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओजचा मनापासून आभारी आहे. महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणे खूप अर्थपूर्ण वाटते आणि आम्हाला खरोखरच भाग्यवान असल्यासारखे वाटते. आम्हाला आशा आहे की, विविध भाषांमधील प्रेक्षक राजा शिवाजीच्या भावनांशी तितक्याच खोलवर जोडले जातील जितक्या आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत.