Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) ज्याच्या खेळ रंगणार त्याचं वास्तव्य टिकणार असं सर्वसाधारण समिकरण आहे. घरात राहण्यासाठी प्रत्येकालाच कष्ट घ्यावे लागतात. आतापर्यंत बिग बॉस मराठीतून चार सदस्यांनी घराचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता या आठवड्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
घन:श्याम, डीपी, सूरज, आर्या, अभिजीत, अरबाज, निक्की हे सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कुणाचा प्रवास संपणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिलीये.
बिग बॉसच्या घरात रंगला नॉमिनेशनचा टास्क
बिग बॉसच्या घरात चर्चासत्र हा नॉमिनेशनचा टास्क रंगला. बिग बॉसच्या घरात ज्याचा खेळ दमदार नाही तो सरळ रद्दीचा भार बनला. प्रोमोमध्ये, असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्यांना आज रद्दीत टाकून इतर सदस्य नॉमिनेट करताना दिसले होते. स्वत:चं डोकं नसणाऱ्यांना, खेळातली समज नसणाऱ्यांना, स्वत:ची मतं नसणाऱ्या, घरातल्या गद्दार व्यक्तीला सदस्य नॉमिनेट करताना दिसले. त्यामुळे आता सहाव्या आठवड्यात कुणाचा प्रवास संपणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.
मित्र झाले गद्दार
दरम्यान नॉमिनेशन टास्कवेळी मित्रच गद्दार झाल्याचं पाहायला मिळालं. वैभवने जेव्हा निक्कीला नॉमिनेट केलं तेव्हा त्या दोघांचं चांगलच भांडण झालं. त्यावेळी निक्की वैभवला म्हणतेय,"तुझ्यापेक्षा या घरात गद्दार कोणीच नाही". त्यावर वैभव म्हणतो,"तुझ्यासाठी इथे मी गद्दारच आहे. तुझ्यासोबत अशी गद्दीरी दाखवणारे की बघ. तू थेट कचरापेटीत जाऊन बस. तुझा बोलण्याचा काही संबंध नाही". निक्कीसोबत वाद घातल्यानंतर वैभव तिचाच नॉमिनेट करतो.
घरातील अनेक समीकरणं मागच्या काही दिवसांमध्ये बदलल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे जी मैत्री बिग बॉसच्या घरात सुरुवातीला दिसली त्याच मैत्रीत आता फुट पडल्यचं पाहायला मिळातंय. आता या मैत्रीमध्ये अशीच फुट राहणार की वेगळी काही नवी समीकरणं दिसणार हे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळेलच. त्याचप्रमाणे या आठवड्यात बिग बॉस घरातल्या स्पर्धकांसाठी कोणतं नवं चक्रव्युह आखणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.