Gautami Patil dance video : लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil dance video) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर तिच्या खास अदा सादर करताना पाहायला मिळत आहे. गौतमीच्या (Gautami Patil dance video) या अंदाजाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. चाहत्यांनी तिच्या डान्स स्टाईलचं कौतुक करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेहमीच आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे चर्चेत राहणारी गौतमी (Gautami Patil dance video) आता या नव्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात छोटे डान्स कार्यक्रम करणारी गौतमी पाटील आता संपूर्ण महाराष्ट्रात मोठी नृत्यांगणा म्हणून प्रसिद्ध झाली आहे. काही दिवसांपूर्वी दहिहंडी उत्सवात तिचा डान्स पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. शिवाय, नृत्यांगणा म्हणून लोकप्रिय झालेल्या गौतमी पाटीलला सिनेमात देखील काम मिळायला सुरुवात झाली आहे. तिने देवमाणूस या मराठी मालिकेत देखील नृत्यांगणा म्हणून काम केले आहे. सध्या ती तिच्या स्विमिंग पूलमधील डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आहे.
गौतमी पाटील हिने महाराष्ट्रात आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गौतमी पाटीलचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या छोट्याशा गावात झाला. वडिलांच्या वर्तनामुळे कुटुंबातील परिस्थिती अत्यंत हलाखीची बनली होती. लावणी महोत्सवात तिने पहिल्या स्टेजवर सादर केलेल्या लावणीने बक्षीस जिंकून आत असलेली क्षमता सिद्ध केली. तिचे पहिले पाउल होते ‘बॅकडान्सर’ म्हणून काम करणे. सोशल मीडियावर, विशेषत: TikTok आणि Instagram वर तिचे व्हिडीओज व्हायरल झाले, ज्यामुळे ती लोकप्रिय झाली. एका सामान्य बॅकडान्सरपासून ती विविध ठिकाणी कार्यक्रम करणारी फ्रंटस्टेजची डान्सर बनली. तिने अनेकदा सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, मूळ डान्सर म्हणून काम करणाऱ्या गौतमीला अभिनय करणे, आव्हानात्मक बनलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Actress Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; इन्स्टाग्रामवरुन कोणती बातमी दिली?
अभिनेता रजनीकांतचा बॉक्स ऑफिसवर धमाका, कुली सिनेमाची 500 कोटींची कमाई; इतिहास रचला