Pitru Paksha 2025: श्रावण संपून भाद्रपद पौर्णिमा नंतरच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून हडपक म्हणजेच पितृपक्ष सुरू होतो. 2025 मध्ये पितृ पक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर 2025 ला आहे (भाद्रपद पौर्णिमा संपल्यानंतर). शेवट 21 सप्टेंबर 2025 ला सर्वपित्री अमावस्याने होतो.

पितृपक्ष म्हणजे काय?

हा काळ पूर्वजांना श्राद्ध, तर्पण, पिंडदान करण्याचा असतो.
ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य दिलं, अशा पितरांचे स्मरण करून त्यांना अन्न, जल, दान अर्पण केलं जातं.
यामुळे पितरांची आत्मा प्रसन्न होते, आणि कुटुंबावर आशीर्वाद, धन-धान्य व समृद्धी प्राप्त होते.

पितृपक्षात करावयाचे उपाय

तिळ तर्पण

 
काळे तीळ पाण्यात टाकून पितरांना अर्पण करणे.
यामुळे पितृ दोष कमी होतो.

पिंडदान

तांदुळ, तिळ, तूप, पाणी वापरून केलेले श्राद्ध.
विशेषत: गयामध्ये केलेले पिंडदान श्रेष्ठ मानले जाते.

दानधर्म

ब्राह्मणांना व गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा द्यावी.
यामुळे पितर संतुष्ट होतात.

सात्विक आचरण

या काळात मांसाहार, मद्यपान, वाईट कृती टाळाव्यात.
पितरांचे स्मरण करून दररोज दीप लावावा.

विशेष उपाय (पितृ दोष निवारणासाठी)

काळ्या कुत्र्याला पोळी द्या.
पिंपळाच्या झाडाखाली तिळ व पाणी अर्पण करा.
शक्य असेल तर गायीला हिरवं गवत द्यावं.
 
राशीप्रमाणे पितृपक्षाचे खास उपाय हे उपाय साधे आहेत, आणि प्रत्येक राशीने पितरांना प्रसन्न करण्यासाठी करावेत.

मेष

पितरांसाठी गुळ-तिळाचं तर्पण करा.
लाल फुलं वाहा आणि पितरांना स्मरण करा.

वृषभ

दुध व तांदूळ अर्पण करा.
गरिबांना पांढऱ्या वस्तू (कपडे/खाद्यपदार्थ) दान करा.

मिथुन

पितरांसाठी मूग आणि गूळ अर्पण करा.
लहान मुलांना खाऊ वाटा.
 
कर्क
 
पाणी व दुधाचं तर्पण करा.
आईसमान स्त्रियांना वस्त्र व अन्न दान करा.

सिंह

पितरांना गायत्री मंत्र जपून स्मरण करा.
गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं/शैक्षणिक वस्तू दान करा.

कन्या

हळद-कुंकवाने सजवलेले तांदुळ अर्पण करा.
गायीला हिरवं गवत खाऊ घाला.

तूळ

गुळ व पाणी पिंपळाखाली अर्पण करा.
गरजू लोकांना सौंदर्यप्रसाधन किंवा वस्त्र दान करा.

वृश्चिक

पितरांसाठी काळे तीळ व जलतर्पण करा.
काळ्या कुत्र्याला रोटी खाऊ घाला.

धनु

गायीला चारा द्या.
गरीब मुलांना गोड पदार्थ द्या.

मकर

उडीद डाळ आणि तिळाचं दान करा.
वृद्ध लोकांना मदत करा.

कुंभ

कापड व नाणी दान करा.
पितरांसाठी दीप प्रज्वलित करून प्रार्थना करा.

मीन

दुध, तूप व साखर अर्पण करा.
पवित्र नदीत स्नान करून तर्पण द्या.
 
हे उपाय पितृ पक्षात केल्यास पितरांची कृपा, पितृ दोष निवारण आणि घरात सुख-शांती मिळते.
 
डॉ भूषण ज्योतिर्विद

हेही वाचा :           

Chandra Grahan 2025: हे भगवंता! शनिच्या राशीत पूर्ण चंद्रग्रहण, सोबत पितृपक्षही, 7 सप्टेंबरनंतर 'या' राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)