Gautami Deshpande :  मुंबईतील ट्रॅफिकची समस्या हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे. इतकच नव्हे तर अगदी सामान्यांपासून ते मोठे कलावंत कायमच या सगळ्यावर भाष्य करत असतात. अनेकांना या ट्रफिकच्या समस्येमुळे बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो, कामावर उशीरा पोहचणं, महत्त्वाच्या कार्यक्रमांना वेळत न पोहचणं अशा अनेक अडचणी येतात. पण खूप ट्रॅफीक असताना बरेच जण बेशिस्तपणाही करतात. याच बेशिस्तपणावर अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हिने तीव्र संताप व्यक्त केला आहे.                


गौतमीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. बीकेसीमधून जाताना खूप ट्रॅफिकमध्ये लोकं करत असलेल्या बेशिस्तपणावर गौतमीने तीव्र संताप व्यक्त केलाय. 'हा मुर्खपणा करायचा नाही...तुम्ही बेअक्कल आहात..' अशा शब्दांत गौतमी ट्रफीकमध्ये बेशिस्तपणाने ड्रायविंग करणाऱ्यांवर भडकली आहे. गौतमीने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर ठेवला आहे. 


गौतमीने काय म्हटलं?


गौतमीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की,  मी आता बीकेसी ते विलेपार्लेला जोडणारा जो उड्डाणपूल आहे. तिथे मी होते आणि पुढे खूप ट्रॅफिक आहे. तर आपल्याकडे काय पातळीची हुशारी आहे. लोकांनी त्या उड्डाणपुलावर यू-टर्न घेतले. अत्यंत वेगाने जिथून गाड्या जात आहे, अशा ठिकाणाहून ते उलटे वन-वेने येत आहेत. या अशा लोकांवर काही कारवाई होतं नाही का? किंवा काही केलं जात नाही का? मला काही कळतं नाही. कारण ते अत्यंत रासरोसपणे उड्डाणपुलावरून यू-टर्न घेऊन मागे गेलेले आहेत. ज्यामुळे अपघात होऊ शकतो किंवा अनेक गोष्टी होऊ शकतात. आपल्याला माहितीये ना, मुंबईत ट्रॅफिक आहे. तर ट्रॅफिकमध्ये थांबायचं. हा मुर्खपणा करायचा नाही. असं करणारे तुम्ही बेअक्कल लोक आहात.


गौतमीनं छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये केलं काम


माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी देशपांडेला (Gautami Deshpande) विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौतमीनं सई ही भूमिका साकारली. सारे तुझ्याचसाठी या मालिकेमध्येही गौतमीनं काम केलं. त्याचप्रमाणे रंगभूमीवर तिच्या गालिब या नाटकाची विशेष चर्चा झाली. या नाटकात तिने अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत काम केलं आहे.




ही बातमी वाचा : 


Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स