Gaurav More :  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi HasyaJatra) फेम गौरव मोरेने (Gaurav More) काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाचा निरोप घेतला. त्यानंतर तो सोनी टीव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे कार्यक्रमात झळकू लागला. या कार्यक्रमात देखील आलेल्या पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना गौरव खळखळून हसवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये त्याच्यासोबत कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी देखील आहेत. पण गौरवच्या या कार्यक्रमावर प्रेक्षकांची सुरुवातीपासूनच नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 


गौरव त्याच्या या कार्यक्रमांचे अनेक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यावर अनेकजण त्याच्या कामाचं कौतुक करतात. तसेच अनेकांकडून त्याच्या कामामुळे त्याला ट्रोल देखील केलं जातं. पण या ट्रोलिंगला दुर्लक्ष करत गौरव त्याच्या कामावर लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळतंय. पण काही वेळा गौरव या ट्रोर्लना उत्तर देखील देतो. 


गौरव हिंदी कार्यक्रमामुळे ट्रोल


काही दिवसांपूर्वी गौरवने त्याच्या शोमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर एकाने कमेंट करत म्हटलं की, सिंह फक्त जंगलात राजा शोभून दिसतो(MHJ), सर्कसमध्ये नाही. म्हणजे प्रेक्षकांना अजूनही गौरवला हास्यजत्रेच्या कार्यक्रमात बघायला आवडेल असं दिसतंय. दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं की, सॉरी भावा पण काही मज्जा येईना इथे. 






गौरव मोरेंवर नेटकरी नाराज...


महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. हिंदीत शो मिळाल्याने मराठीकडे पाठ फिरवली का, असा सवाल चाहत्यांनी गौरवला विचारला. त्यावर गौरवने   “Respect बडी चीज है भाई” असे म्हटले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये स्किटमध्ये  ‘I am a गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…’ या वाक्याने त्याची धमाकेदार एन्ट्री होत असे. त्याच्या या एन्ट्रीला प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटत असे.       



                                                   


ही बातमी वाचा : 


Marathi Movie : जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लियमेची जबरदस्त जोडी एकत्र, बंधू सिनेमाच्या शुटींगला फलटण आणि वाईमध्ये सुरुवात