Gaurav More Goes To Propose Tejashri Pradhan: लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम गौरव मोरे (Gaurav More) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौरव मोरे तेजश्री प्रधानला लग्नाची मागणी घालत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, नेमकं खरं काय? हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? तर, हा तेजश्रीची नवीकोरी मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो आहे. या मालिकेत तेजश्रीसोबत सुबोध भावे (Subodh Bhave) दिसणार आहे.  

Continues below advertisement


'हॅशटॅग तदैव मंगलम' या सिनेमानंतर तेजश्री आणि सुबोधची लोकप्रिय जोडी पुन् प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवर तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत दोघांची सुपरहिट जोडी स्क्रिन शेअर करणार आहे. या मालिकेत तेजश्रीने स्वानंदीची भूमिका साकारली असून सुबोधने समरची भूमिका साकारली आहे. 


मालिकेत तेजश्री म्हणजेच, स्वानंदीचं लग्न काही केल्या ठरतंच नसतं. अशातच एक नवं स्थळ स्वानंदीला चालून आलं आहे. गौरव मोरे स्वानंदीला लग्नाची मागणी घालायला गेला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  


सोशल मीडियावरच्या व्हायरल व्हिडिओमध्ये, गौरव स्वानंदीला विचारतो, 'तुमचं नाव?' त्यावर तेजश्री, 'स्वानंदी' असं म्हणते. गौरव, स्वानंदीला पुढे तुम्ही काय करता असं विचारतो. त्यावर स्वानंदी म्हणते, 'मी एन्व्हायर्मेंटल सायन्समध्ये पीएचडी केली आहे आणि टुरिस्ट कंपनीमध्ये जॉबही करते.' नेमकं स्वानंदीचं शिक्षण किती झालंय, हे गौरवला कळतंच नाही... स्वानंदीन सांगितलेलं त्याच्या डोक्यावरून जातं. गौरव स्वानंदीला विचारतो, 'म्हणजे तुमची बारावी झाली नाहीये...' हे ऐकून स्वानंदीला आश्चर्य वाटतं. ती अवाक् होऊन त्याच्याकडे पाहते आणि पुढे स्वानंदी गौरवला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारते. मग मात्र गौरवची भंबेरी उडते आणि गौरव विषयाची टाळाटाळ करतो आणि म्हणतो, तुमचं घर छान आहे, सोफा पण मस्तय...'






स्वानंदी गौरवला चहा घ्यायला सांगते. त्यावर गौरव म्हणतो, 'मी कॉफी लव्हर आहे' गौरव इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर स्वानंदी त्याच्यासोबत धडाधड इंग्रजीमध्ये बोलते. तेसुद्धा गौरवच्या डोक्यावरून जातं. पुन्हा गौरव विषय टाळतो. स्वानंदी त्याला तुम्ही काय करता असं विचारते. तेव्हासुद्धा तो थापा मारतो. तुम्ही पैसे कमावण्यासाठी काय करता? असं पुन्हा स्वानंदी त्याला विचारते. त्यावर, 'भगवान का दिया बहोत है अपने पास, दौलत है, इज्जत है' तुमची हॉबी काय आहे? असं विचारल्यावर गौरवला काही समजत नाही. त्याला हॉबीचं बॉबी ऐकायला येतं. पुन्हा स्वानंदी त्याला छंद काय आहेत तुमचे असं विचारते. गौरव, 'मला ट्रॅव्हलिंग आवडतं' हे गौरव इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. ऑफिसला जाण्यायेण्याचं ट्रॅव्हलिंग मला खूप आवडतं.' हे ऐकून स्वानंदी गोंधळते. गौरव इमोशनल ड्रामा सुरू करतो. स्वानंदी वैतागते आणि शेवटी तुम्ही निघा असं म्हणते...


दरम्यान, हा व्हिडीओ झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा हॅन्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना एक क्लासी कॅप्शन दिलं आहे. 'कांदयापोह्याच्या कार्यक्रमाला आलेत गौरव शेठ, स्वानंदीसोबत त्यांची वीण जुळेल का हो थेट?', असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तेजश्री, गौरवचा कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ मालिकेच्या प्रमोशनचा एक भाग आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aniruddhacharya Statement On Bollywood: 'बिग बी आपल्या मुलांना चमच्यानं दारू पाजत असतील...'; कथावाचक अनिरुद्धाचार्यांची जीभ घसरली, नेमकं घडलं काय?