Aniruddhacharya Statement On Bollywood: वृंदावनचे प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य (Aniruddhacharya) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी अलीकडेच बॉलिवूडबद्दल (Bollywood News) एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी बी-टाउनची तुलना 'ब्रिटिश राज'शी केली आहे आणि अश्लील चित्रपटांवर बंदी घालण्यावरही मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच, अनिरुद्धाचार्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रणवीर सिंहवरही (Ranveer Singh) निशाणा साधला आहे.
कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी बॉलिवूडवर भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. अनिरुद्धाचार्य याबाबत बोलताना म्हणाले की, चित्रपटांमध्ये सुना आणि मुलींना अशा कपड्यांमध्ये दाखवलं जातंय की, ज्याचा समाज आणि मुलींवर वाईट परिणाम होतोय. आता मुलींनाही चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे कपडे घालायचे आहेत.
अनिरुद्धाचार्य यांनी रणवीर सिंहवर साधला निशाणा
रणवीर सिंहचे उदाहरण देताना अनिरुद्धाचार्य म्हणाले की, केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही नग्न होणं चुकीचं आहे. रणवीरबद्दल बोलताना ते म्हणाले की, जर इतक्या पैसेवाल्या स्टारनं अशा प्रकारे नग्न फोटो काढले, तर ते बरोबर आहे का? माझा यालाच विरोध आहे.
अनिरुद्धाचार्यानी अमिताभ बच्चन यांच्यावरही निशाणा साधला
पुढे बोलताना अनिरुद्धाचार्यांनी अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या 'जीना अगर जरूरी है तो पीना बहुत जरूरी है...' या गाण्याचा उल्लेख केला. परखड वक्तव्य करत ते म्हणाले की, "मग बच्चन साहेब त्यांच्या मुलांना आणि कुटुंबातील भावी पिढ्यांना दारू पाजत असतील. ते म्हणतात की जर आमचे मूल चित्रपट पाहायला गेले आणि अमिताभ त्याला दारू पिण्यास शिकवले तर तोही दारू पिईल. हे समाजाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल..."
अश्लील फिल्म्सवर बंदीची मागणी
मग त्यांनी यो यो हनी सिंगच्या 'ब्लू है पानी पानी' या गाण्याचा उल्लेख केला आणि म्हटलं की, महिलांना कमी कपड्यांमध्ये उभं केलं जातंय, हे पाहून आपली मुलं काय शिकतील...? अशा चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, ज्यामध्ये अश्लीलता दाखवली जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :