Shani Dev: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना 'कर्मफळ दाता' मानले जाते. असे म्हटले जाते की शनिदेव माणसाने जे काही कर्म केले त्याचे फळ देतात. म्हणून, कोणालाही शनिदेवांची भीती बाळगण्याची गरज नाही. ज्या लोकांच्या कुंडलीत शुभ शनि आहे त्यांच्यासाठी साडेसातीचा काळ खूप फलदायी असतो आणि अशा लोकांची या काळात खूप प्रगती होते. ज्योतिषशास्त्रात शनिची साडेसाती एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली काळ मानला जातो. हा काळ प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत शनिच्या हालचालीवर आधारित असतो. साडेसातीच्या काळात व्यक्तीच्या आयुष्यात आव्हाने, संघर्ष आणि बदल येतात. साडेसातीचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर खोलवर जाणवतो. सध्या न्याय देवता आणि कर्मदाता शनिदेव मीन राशीत भ्रमण करत आहेत. त्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांना साडेसाती सुरू आहे. या भागात आपण जाणून घेऊया की या तिन्ही राशींना शनि साडेसातीपासून कधी मुक्तता मिळेल?

म्हणून कर्म चांगले करा...शनिदेव त्रास देणार नाहीत..

ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांना शनि साडेसातीचा त्रास होईल, हे त्यांच्या कुंडलीतील शनिची स्थिती पाहून कळू शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कर्म चांगले असते, तेव्हा शनीची ही स्थिती त्या व्यक्तीला त्रास देत नाही. दुसरीकडे, वाईट कृत्ये करणाऱ्या आणि इतरांचे वाईट करणाऱ्यांना या काळात त्यांच्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांना साडेसाती सुरू आहे. या राशींना त्यातून कधी मुक्तता मिळेल ते जाणून घेऊया.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसतीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, त्यांना त्यातून मुक्त होण्यास वेळ लागेल. कुंभ राशीच्या लोकांना 31 मे 2032 रोजी शनीच्या साडेसतीपासून मुक्तता मिळेल.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे, ज्यामुळे या लोकांवर शनीचा हात हलका आहे. 23 फेब्रुवारी 2028 रोजी कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्तता मिळेल.

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. साडेसातीचा प्रभाव मीन राशीच्या लोकांवर खूप खोलवर होणार आहे, ज्यामुळे या राशीच्या लोकांना 17 एप्रिल 2030 रोजी मुक्तता मिळेल.

हेही वाचा :           

Angaraki Chaturthi 2025: उद्याची अंगारकी चतुर्थी 'या' 5 राशींचे नशीब पालटणारी! अखेर बाप्पाची कृपादृष्टी झालीच, संकटमुक्त व्हाल, सोबत पैसाही येईल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)