Gashmeer Mahajani On Pravin Tarde: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) गाजलेला सिनेमा 'देऊळ बंद'च्या (Deool Band) पार्श्वभूमीवर त्याचा पुढचा भाग 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) रिलीज करण्यात आला. रिलीज होताच या सिनेमानं धुवांधार कमाई केली. सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' (Marathi Movie Deool Band) या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेलं आणि त्यानंतर आलेल्या 'देऊळ बंद 2' सिनेमानंही बॉक्स ऑफिस गाजवलं. या सिनेमानं 100 कोटींच्या कलेक्शनचा आकडा गाठलाय. नुकतीच सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आलेली. या कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी फक्त झाले होते, अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रवीण तरडेंचे कौतुक केलंय. यामध्ये 'देऊळ बंद' सिनेमातला त्यांचा हिरो गश्मीर महाजनीचाही समावेश आहे. 

Continues below advertisement

साधारणतः दहा वर्षांपूर्वी आलेल्या 'देऊळ बंद'मध्ये गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यानं राघव शास्त्रींची मध्यवर्ती भूमिका साकारलेली. त्यामुळे दुसऱ्या भागातही कथा त्याच पात्राभोवती फिरणार, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांनी मात्र, यावेळी कथाच बदलली आणि त्यासोबतच सिनेमातलं मुख्य पात्रसुद्धा बदललं. 'देऊळ बंद 2'मध्ये प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे झळकली आणि अगदी प्रेक्षकांना सरप्राईज देत गश्मीरचा काही मिनिटांचा एक सीन आहे. पण, तरीसुद्धा प्रेक्षक 'देऊळ बंद'मधल्या राघव शास्त्रीला विसरलेले नाहीत. गश्मीरनं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलंय. अशातच आता गश्मीरनं सोशल मीडियावर एक पोस्ट करुन 'देऊळ बंद 2' सिनेमाचं भरभरुन कौतुक केलंय. 

गश्मीर महाजनी नेमकं काय म्हणाला?

Continues below advertisement

गश्मीर महाजनी याची पत्नी गौरीनं प्रवीण तरडे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्टेजवर अनेक लोकप्रिय कलाकार दिसत आहेत. प्रवीण तरडे, मंगेश देसाई, विजू माने, अतुल यांच्यासह अनेक कलाकार स्टेजवर आहेत. तसेच, त्यांच्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळदेखील आहेत.

याच फोटोला शेअर करत गश्मीर महाजनीनं लिहिलंय की, "100 कोटींची मेहनत आहे, जी परतफेड करतेय...". यानंतर त्यानं प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि पिट्या भाई यांना टॅग करत पुढे लिहिलंय की, "आणि प्रत्येक ती व्यक्ती, जिच्या पाठीशी स्वामी आहेत... 100 कोटी शुभेच्छा", असं म्हणत गश्मीरनं हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

दरम्यान, 'देऊळ बंद 2' सिनेमाच्या प्रचंड यशानंतर आता प्रवीण तरडेंच्या 'मुळशी पॅटर्न 2'ची चर्चा सुरू आहे. तसेच, या सिनेमात कोण झळकणार? यातीही उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. गश्मीर महाजनी '108 बेस हॉस्पिटल उरी'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Praveen Tarde On Snehal Tarde: 'माझ्या पुढच्या कोणत्याच सिनेमात ती नसेल...'; 'देऊळ बंद 2'मध्ये गाजल्यानंतरही पत्नी स्नेहल तरडेला कास्ट करणार नाहीत, प्रवीण तरडेंनी कारण सांगितलं