Mumbai Crime News : मुंबई लोकल ट्रेनमध्ये पुन्हाएकअतिशयखळबळजनकघटनाघडल्याचेसमोरआलंआहे. यात प्रवाशावर एकाने कोयत्याने हल्ला (Mumbai Crime News) केल्याचंसमोरआलंआहे. मुंबईहून अंबरनाथला (Ambernath) जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai local train) एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला झालाय. यातप्रवासीगंभीर जखमी झालाअसूनया प्रवाशाला कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जनरल डब्यात जागेवरून दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू होता. याचवादातूनहिरक्तरंजितघटनाघडलीअसल्याचेप्राथमिकतपासातसमोरआलंआहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचाअधिकतपासकरतअसूनयाघटनेनेमात्रपुन्हाएकदाखळबळउडालीआहे. (Mumbai Crime News) 

Mumbai Crime News : हल्लेखोर ठाकुर्ली स्टेशनवर उतरले आणि फरार झाले

मिळालेल्यामाहितीनुसार, ही घटना ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री 12.10 वाजता घडली. जनरल डब्यात जागेवरून दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू होता. ट्रेन ठाकुर्ली स्टेशनवर पोहोचताच तीन प्रवाशांनी दुसऱ्या एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला केला. हल्लेखोर ठाकुर्ली स्टेशनवर उतरले आणि फरार झाले. कल्याण स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी जखमी प्रवाशाला ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले. तरफरारमारेकऱ्यांचासध्यापोलीसशोधघेतआहे.

"माझ्या मुलाच्या मारेकऱ्याला फाशी द्या, आम्हाला न्याय द्या, मयंक लोहारच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडेमागणी

अलीकडेच, लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि 22 वर्षांच्या मयंक लोहारला (Mayank Lohar) त्याचे प्राण गमवावे लागल्याचीघटनाताजीआहे. अशातच मयंक लोहारच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाप्रकरणी पीडित कुटुंबाने न्यायासाठी सरकारकडे धाव घेतली आहे. बुधवारी, मयंकचे आई-वडील आणि बहिणीने मंत्रालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आरोपीला कठोरातकठोर शिक्षा (मृत्युदंड) द्यावी आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी कुटुंबाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मयंकचे कुटुंब भावनाविवश झाले. मयंकची आई, मेघा, हात जोडून रडत म्हणाल्या, "माझ्या मुलाच्या मारेकऱ्याला फाशी द्यावी. आम्हाला फक्त न्याय हवा आहे."

तरदुसरीकडे, मयंकचे वडील, रमेश लोहार यांनी या घटनेचे वर्णन भीषण असे केले आणि म्हणाले, "ही घटना इतकी भीषण होती की अंगावर काटा येतो. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मागणी केली आहे की आरोपीला फाशी देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात लोकल ट्रेनमध्ये असा भीषण गुन्हा करण्याचे धाडस कोणीही करणार नाही."

Mumbai Crime News : मुंबईतनेमकंचाललंयतरीकाय?

मुंबई लोकल ट्रेनमध्ये 23 जून रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून 23 वर्षीय मयंक लोहारची चाकूने हत्या करण्यात आली होती. या घटनेने मुंबई लोकलच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरया घटनेनंतर माहिममध्येही स्टेशनबाहेर एकावर चाकू हल्ल्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर अलीकडेच नेहमी वर्दळ असलेल्या सीएसएमटी रेल्वे स्टेशन एकाने लोकांवर धारदार कोयता उगारल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळेमुंबईतनेमकंचाललंयतरीकाय? असाप्रश्नविचारण्याचीवेळआलीआहे.

इतर महत्वाच्या बातम्या