Gashmeer Mahajani Answers On Phullwanti Movie: मराठी सिनेसृष्टीचा (Marathi Film Industry) हँडसम हंक म्हणजे, गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani). अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला गश्मीर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. तो स्वतःबाबतचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतोच, त्यासोबतच तो त्याच्या चाहत्यांसोबतही संवाद साधतो. गश्मीर महाजनी अनेकदा इन्स्टाग्रामवर 'आस्क गश' हे प्रश्नोत्तराचं सेशन घेतो. यामध्ये चाहते गश्मीरला भन्नाट प्रश्न विचारतात. गश्मिर त्या प्रश्नांची उत्तर देतो. नुकतंच त्यानं इन्स्टाग्रामवर 'आस्क गश' हे सेशन घेतलेलं. 

Continues below advertisement


गश्मीर महाजनीला त्याच्या सेशनमध्ये एका चाहत्यानं विचारलं की, 'फुलवंती' सिनेमात (Phullwanti Movie) दाखवलं तसंच खऱ्या आयुष्यातही नकळत तू कोणा दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? यावर गश्मीरनं चाहत्याला एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवलाय. गश्मीर म्हणाला की, 'प्रेमात पडणं हे कधीच नकळत होत नसतं'. गश्मीरनं एकाच वाक्यात विषय संपवल्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालेलं. 


पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी रुपेरी पडद्यावर अवतरली. अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि तेवढीच धारदार संवादाची सोबत असलेल्या 'फुलवंती' सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली. 


'फुलवंती' सिनेमाबाबत थोडंस... 


'फुलवंती चित्रपटात पेशवाई काळातील एक प्रसिद्ध नर्तिका 'फुलवंती' आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील प्राजक्ता माळीचे आरसपाणी सौंदर्य आणि गश्मीर महाजनीचा प्रकांडपंडीत यांचा लूक पाहण्यासारखा आहे. देखण्या कलाविष्काराने सजलेली फुलवंती मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरली आहे. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला की हे हिट हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pooja Birari Reaction On Relationaship With Soham Bandekar: पूजा बिरारी आदेश बांदेकरांची होणारी सुनबाई? अभिनेत्री हळूच हसली, मग लाजत लाजतच म्हणाली...