Yashwant Sardeshpande Passed Away: रंगभूमीवरचे प्रसिद्ध कलाकार आणि चित्रपट निर्माते यशवंत सरदेशपांडे (Yashwant Sardeshpande Death) यांचं निधन झालं असून वयाच्या 62 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) बंगळुरू येथे त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मालती सरदेशपांडे असा परिवार आहे. दरम्यान, दिवंगत निर्माते यशवंत सरदेशपांडे यांच्या पत्नीसुद्धा सिनेसृष्टीत सक्रिय असून त्या उत्तम अभिनेत्री आहेत. निर्माते यशवंत सरदेशपांडे यांनी कन्नड मनोरंजनसृष्टीत मोलाचं योगदान दिलं. 

Continues below advertisement

कन्नड रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांचे कर्तेधर्ते आणि चित्रपट निर्माते यशवंत सरदेशपांडे यांचं सोमवारी 29 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं बंगळुरू येथे निधन झालं. छातीत दुखू लागल्यानं ते अचानक बेशुद्ध पडले, त्यानंतर त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले, पण सर्वच्या सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यशवंत सरदेशपांडे यांच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. ते एक प्रसिद्ध नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक होते, जे त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मालती सरदेशपांडे आणि त्यांची मुलगी असा परिवार आहे.

रविवारी धारवाड येथे त्यांनी नाटक सादर केले होते. मात्र सोमवारी सकाळी बंगळुरूमध्ये पोहोचल्यावर त्यांना छातीत दुखू लागलं. लगेच फोर्टिस रुग्णालयात नेलं असता, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

Continues below advertisement

यशवंत सरदेशपांडे यांना 'ऑल द बेस्ट'मुळे मिळाली खरी ओळख 

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या कठीण काळात यशवंत सरदेशपांडे यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी कन्नड रंगभूमीतील त्यांच्या कामाचं स्मरण केलं आणि त्यांचं सर्वात लोकप्रिय नाटककारांपैकी एक म्हणून वर्णन केलं. त्यांनी भारतातील अनेक नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन देखील केलं. अभिनय आणि दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले यशवंत सरदेशपांडे यांना 'ऑल द बेस्ट' या नाटकानं प्रसिद्धी मिळाली. त्यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्येही काम केलंय.

यशवंत सरदेशपांडे यांचा जीवपरिचय

'नागेया सरदार' म्हणून प्रसिद्ध असलेले यशवंत सरदेशपांडे यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बसवाना बागेवाडी तालुक्यातील उक्कली गावात झाला. त्यांनी लहान वयातच नाट्य क्षेत्रात अभिनय करण्यास सुरुवात केली आणि नंतर हेग्गोडू येथील प्रसिद्ध निनासम थिएटर स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि नाट्यशास्त्रात डिप्लोमा मिळवला. त्यानंतर त्यांनी 1996 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून सिनेमा आणि नाट्यलेखनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aai Kuthe Kay Karte Fame Rupali Bhosale Car Accident: मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेचा भीषण अपघात; लग्झरी कारची झालीय अत्यंत वाईट अवस्था