Pooja Birari Reaction On Relationaship With Soham Bandekar: महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आता लवकरच सासरेबुवा होणार असून लेक सोहम बांदेकरची (Soham Bandekar) लगीनघाई सुरू झाल्याचं बोललं जात आहे. तसेच, मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari) लवकरच सोहम बांदेकर लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलेलं. अशातच आता पहिल्यांदाच यावर अभिनेत्री पूजा बिरारीनं प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी अभिनेत्री पूजा बिरारी आता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांची सुनबाई होणार आहे, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. अद्याप याबाबत बांदेकर कुटुंबीयांनी किंवा सोहम, पूजानं अधिकृतरित्या काहीच सांगितेलं नाही. पण, पूजा बिरारीचं बांदेकरांच्या घरच्या बाप्पाच्या आरतीला दिसणं, त्यानंतर पूजा आणि सोहम यांच्या बोलण्यातून आणि एक्सप्रेशन्समधून दोघएही रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. असातच आता पूजा बिरारीनं हसत हसत, लाजत खूप काही सांगितलं आहे.
भावी जोडीदाराबद्दल काय म्हणाली पूजा बिरारी?
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पूजा बिरारीला विचारण्यात आलं की, मालिकेतील राया खूपच तापट आहे, पण खऱ्या आयुष्यातील राया खूपच शांत आहे, त्याबद्दल काय सांगशील? यावर पूजा बिरारी खूप प्रचंड लाजली. काही क्षण तर ती फक्त हसतच होती. हसत लाजतच तिनं सांगितलं की, "नाही, मला यावर काही नाही म्हणायचं. इतक्यात तरी काही नाही म्हणायचं यावर."
डेटिंगच्या बातमीबाबत पूजाला प्रश्न विचारण्यात आले, त्यावर बोलताना पूजा म्हणाली की, "मी आता काय बोलू आणि काय नको असं होतंय... मी सेटवर कधीच झोपत नाही... त्यादिवशी मी झोपले होते सेटवर... आमचं डे नाईट डे नाईट सुरू होतं, मधे थोडा गॅप होता म्हणून मी झोपले. पण, मी झोपून उठले, तेव्हा मला असे भरमसाठ मिस्ड कॉल्स होते. ठीक आहे आता, याहून जास्त मी काही नाही बोलत..."
अभिनेत्री पूजा बिरारी कोण?
मराठी टेलिव्हिजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी पूजा बिरारी 29 वर्षांची आहे. तिनं 'साजणा' मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती 2021 मध्ये स्टार प्रवाहवर आलेल्या 'स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा' मालिकेतून घराघरांत पोहोचली. सध्या ती 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेमध्ये दिसतेय. या मालिकेत ती बिग बॉस मराठीचा विनर विशाल निकमसोबत स्क्रिन शेअर करतेय. पूजा बिरारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :