California Wild Fire: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आगीचा कहर अद्याप मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. लॉस एंजलिस व अन्य काही ठिकाणी लागलेली आग (California Wild Fire) भडकली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कॅलिफोर्नियाच्या अनेक जंगलात पसरलेली आग (California Wild Fire) हॉलीवूड हिल्सपर्यंत पोहोचली. या वणव्यामुळे हॉलिवूडमध्येही मोठी नासधूस झाली आहे. अनेक कलाकारांची घरे आणि स्टुडिओही आगाच्य भक्ष्यस्थानी आलेली आहेत. (California Wild Fire) 


आग हॉलीवूड हिल्सपर्यंत पोहोचली 


अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील अनेक जंगलांमध्ये मोठी आग पसरली आहे. या वणव्यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. वाढत्या प्रमाणात ही आग (California Wild Fire) हॉलीवूडच्या हिल्सपर्यंत पोहोचली. या नव्या आगीमुळे शहरातील मोठा परिसर धोक्यात आला आहे. अग्निशमन दल आधीच शहराच्या इतिहासातील सर्वात भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. लॉस एंजेलिस अग्निशमन दलाला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आग विझवावी लागत आहे. तरीदेखील अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. लॉस एंजेलिसमधील हॉलीवूडच्या हिल्सपर्यंत सर्वत्र जंगलातील आगीचा दाट धूर पसरल्याचं चित्र दिसून येत आहे.


अनेक हॉलिवूड स्टुडिओ धोक्यात...


जगातील अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे स्टुडिओ हॉलीवूड हिल्सवर आहेत.  वॉर्नर ब्रदर्स, युनिव्हर्सल पिक्चर्स, पॅरामाउंट पिक्चर्स, वॉल्ट डिस्ने पिक्चर्स यांच्या अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे सुरू आहे. याशिवाय अनेक हॉलिवूड स्टार्सही या ठिकाणी राहतात. आग लागल्यानंतर, अनेक कलाकारांनी त्यांची घरे सोडली असून स्थलांतर केले आहे.


हॉलिवूड हिल्सवर सर्व काम ठप्प...


जंगलातील भीषण आगीने संपूर्ण डोंगराला वेढले आहे. तेव्हा लोकांना आपली घरे, संसार, काम सोडून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे चित्रपट निर्मितीवरही परिणाम झाला आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अग्निशमन दलाचे जवान लॉस एंजेलिसमधील जंगलातील आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. हॉलिवूड हिल्समध्ये दोन दिवसांपूर्वीपर्यंत सर्व काही ठीक होते. लॉस एंजेलिसच्या आसपासच्या जंगलात लागलेल्या आगीनंतर या ठिकाणचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.


हजारो लोकांनी हॉलिवूड हिल्स सोडले


अनेक हॉलिवूड प्रोडक्शन हाऊस आगीच्या प्रभावाखाली येऊ शकतात. अधिकाऱ्यांनी लोकांना मुलहोलँड ड्राइव्ह आणि हॉलीवूड बुलेव्हार्डने वेढलेल्या भागातून बाहेर पडण्यास सांगितले होते. आता येथे राहणारे लोक सर्व काही सोडून या ठिकाणाहून स्थलांतरित झाले आहेत. आग लागल्यानंतर सर्वत्र फक्त धूर आणि राख दिसत आहे. लोकांची घरे, वाहने आणि सामान जळून खाक झाले आहे.


लाखो लोक झाले बेघर 


या जंगलातील आगीचे वर्णन लॉस एंजेलिसच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी आग म्हणून केले जात आहे. या जंगलातील आगीमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 25 हजार एकरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली आहे.1 लाखांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत. लाखो लोकांना वीजपुरवठा खंडित होत आहे. लोक पश्चिम हॉलीवूड आणि बेव्हरली हिल्समधून पश्चिमेकडील सनसेट बुलेवर्डच्या दिशेने देखील गेले आहेत.  आग 15,000 एकर परिसरात पसरली आहे. त्यामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक घरे उद्ध्वस्त झाले आहेत.