मुंबई : मराठी कलाविश्वासोबतच भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळं पान जोडणाऱ्या 'आनंदी गोपाळ' या चित्रपटावर आजवर अनेकदा आणि अनेक पद्धतींनी कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. पुरस्कार म्हणू नका किंवा मग प्रेक्षकांचं प्रेम. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या दिवसापासून ते आजतागायत त्याचं वेगळेपण जपलं आहे. अशा या चित्रपटाच्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. हा मानाचा तुरा आहे फिल्मफेअर पुरस्कारांचा.
अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सूत्रांची माहिती
समीर विद्वांस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ' या चित्रपटाला फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स 2020 मध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 10 पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटानं मराठी कलाविश्वात एक अनोखा विक्रमच रचला आहे.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विविध पुरस्कारांच्या विभागांमध्ये 16 नामांकनं मिळालेल्या 'आनंदी गोपाळ' या चित्रपटानं 10 पुरस्कारांवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. सर्वात मानाचा असा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअरही याच चित्रपटाच्या खात्यात गेला.
पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती)- बाबा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- समीर विद्वांस
सर्वोत्कृष्ट अभिनेता- दीपक डोब्रियाल
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मुक्ता बर्वे
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती)- ललित प्रभाकर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती)- सोनाली कुलकर्णी (हिरकणी), भाग्यश्री मिलिंद (आनंदी गोपाळ)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण)- शिवानी सुर्वे (ट्रीपल सीट)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण)- सलील कुलकर्णी (वेडिंगचा शिनेमा)
सर्वोत्कृष्ट पटकथा- करण शर्मा (आनंदी गोपाळ)
सर्वोत्कृष्ट संवाद - इरावती कर्णिक (आनंदी गोपाळ)
सर्वोत्कृष्ट कथा- मनिष सिंह (बाबा)
सर्वोत्कृष्ट छायांकन - आकाश अग्रवाल (आनंदी गोपाळ)
सर्वोत्कृष्ट संकलन - चारुश्री रॉय (आनंदी गोपाळ)
सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन- निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (फत्तेशिकस्त)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- पूर्णिमा ओक (फत्तेशिकस्त)
सर्वोत्कृष्ट गीते (म्युझिक अल्बम)- आनंदी गोपाळ