मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना 24 तासात रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका बॉलीवूड हंगामा या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 24 तासात त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात येईल.
सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात आणि त्या माध्यमातून आपल्या रोजच्या आयुष्याबद्दल माहिती देतात. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केवळ एकच ओळ लिहलीय. त्यांनी लिहलंय की, "मेडिकल कन्डिशन.... सर्जरी... मी लिहू शकत नाही. एबी." अमिताभने हा ब्लॉग 27 तारखेला लिहलाय. बीग बींचा हा ब्लॉग वाचल्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
गेल्या वर्षी बिग बी यांना कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ यांच्याबरोबर मुलगा अभिषेक, पत्नी ऐशवर्या, नात आराध्या यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सध्या त्यांच्या अनेक चित्रपटांचे शुटिंग सुरु आहे. कोण बनेगा करोडपती 12 हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर अमिताभ ब्रह्मस्त्र आणि चेहरे या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते. याचदरम्यान ही बातमी आल्याने सर्वजण काळजीत आहेत.