Rajeshwari Kharat Relationship : नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule) पदार्पणातील 'फँड्री' (Fandry) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. चित्रपटाचा आशय, दिग्दर्शन कौशल्य, कलाकारांचा अभिनय यामुळे 'फँड्री' चांगली कलाकृती झाली. त्याशिवाय, यात काम केलेल्या नवोदित कलाकारांनादेखील या चित्रपटाने ओळख दिली. या चित्रपटातील शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. राजेश्वरीच्या फोटोवरून ती रिलेशनशीपमध्ये आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. राजेश्वरी आपलं नवीन फोटोशूट, प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना देत असते. तरुणाईमध्ये तिचे फॅन फॉलोईंग चांगले आहे. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोवरून आता कमेंट्चा पाऊस सुरू झाला आहे.
काय आहे फोटोत?
राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर आपल्या एका मित्रासह फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कोणतेही कॅप्शन नाही. फक्त रेड कलरचा हार्ट इमोजी पोस्ट करण्यात आला आहे. त्यावरून राजेश्वरी खरात आता रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या फोटोतील तरुणाचे नाव रोहन गवई आहे. राजेश्वरी खरातच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने दिलेल्या शुभेच्छांवर तिने लव्ह इमोजी देत आभार मानले होते.
नेटकऱ्यांनी काय म्हटले?
राजेश्वरी खरातच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी थट्टा-मस्करीच्या स्वरात कमेंट्स केल्या आहेत. काहींनी ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाने म्हटले की, जब्या मोठा गेम झाला रे. तर दुसऱ्याने गुलिगत धोका एवढंच म्हटले. शेवटपर्यंत जब्यला काळी चिमणी घावली नाही, असेही एकाने म्हटले. एका युजरने लव्ह बर्डस असल्याची कमेंट केली. एका युजरने तुम्ही भाऊ-बहीण छान दिसताय असेही एकाने म्हटले.
राजेश्वरीच्या फोटोतील मिस्ट्री बॉय कोण?
राजेश्वरी सोबत दिसणारा तरुण रोहन गवई कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहन हा राजेश्वरीचा मॅनेजर असल्याचे एका युजरने म्हटले. तर, दोघेजण चांगले मित्र-मैत्रिण असल्याचे एकाने म्हटले.