Aishwarya Rai Quit A Film : "एकेदिवशी त्याने मला खूप मारलं. माझा जबडा तोडला. माझ्या प्रायव्हेट पार्टवर त्याने ठोसा मारला आणि फोन देखील हिसकावून घेतला", हे बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं होतं. तिने सांगितलं की, मी एका निर्मात्याच्या प्रेमात होते. मात्र, त्या नात्यात मला अपमानास्पद आणि हिन दर्जाची वागणूक मिळू लागली. जेव्हा अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला यबाबत समजलं तेव्हा तिने त्या निर्मात्याचा सिनेमा रिजेक्ट केला होता. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात...
प्रायव्हेट पार्टवर मारल्यानंतर झाली होती बेशुद्ध
अभिनेत्री फ्लोरा सैनी हिने 2018 मध्ये मी टू चळवळ सुरु झालेली असताना मोठे खुलासे केले होते. फ्लोराने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या वाईट कृत्याबाबत भाष्य केलं होतं. रिलेशनशिपमध्ये असताना निर्माता असलेल्या बॉयफ्रेंडने कशा पद्धतीने अत्याचार केले याबाबतही तिने सांगितलं होतं. तो कधी काम सोडून देण्यासाठी जबरदस्ती करायचा, तर कधी फोन देखील हिसकावून घ्यायचा. एकदा तर माझा जबडा देखील तुटला होता. अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टवर मारल्यानंतर ती बेशुद्ध झाली होती. मात्र, सावरल्यानंतर तिने घर गाठलं आणि त्यानंतर त्या निर्मात्याचा चेहरा देखील पाहिला नाही.
दरम्यान, एका मुलाखतीत फ्लोरा सैनी हिने या प्रकरणानंतर मला ऐश्वर्या रॉयचा सपोर्ट मिळाल्याचंही सांगितलं होतं. अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने फक्त तिला सपोर्टच केला नाही तर संबंधित निर्मात्यासोबत काम करण्यास नकार देखील दिला होता.
ऐश्वर्या रॉय फ्लोराच्या मदतीला धावली
ऐश्वर्या रॉयला सैनीसोबत झालेल्या अत्याचाबाबत 2018 समजलं तेव्हा तिने तिला सपोर्ट केला. बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत सैनीने हा गौप्यस्फोट केला होता. सैनी म्हणाली, माझ्यासोबत कोणीही काम करण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा ऐश्वर्याने माझ्यासोबत काम करण्याची हिंमत दाखवली.
फ्लोरा सैनी म्हणाली होती की, तेव्हा मी याबाबत भाष्य केलं होतं. मला वाटलं माझ्याकडून मोठी चूक झाली. कारण मी निर्मात्याचं सत्य सर्वांसमोर जाहीर केलं होतं. त्यामुळे कोणीही माझी साथ द्यायला तयार नाही. माझ्या कुटुंबात केवळ मीच कमावणारी होते. तेव्हा मी सर्वकाही सहन केलं होतं. मात्र, काम न मिळत नसल्याने माझ्यापुडे बिकट परिस्थिती ओढावली होती. तेव्हा ऐश्वर्या रॉयने मला साथ दिली. तिचे मी धन्यवाद मानते.
ऐश्वर्या रॉयने रिजेक्ट केला सिनेमा
फ्लोरा सैनीने सांगितलं की, त्या प्रसिद्ध निर्मात्याचा सिनेमा ऐश्वर्याने साईन केला होता. मात्र, जेव्हा माझ्यासोबत झालेल्या अत्याचाराबाबत सजलं तेव्हा तिने त्याचा सिनेमा रिजेक्ट केला. महिलेसोबत वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करु शकत नाही, असं ऐश्वर्या रॉयने म्हटलं होतं.
फ्लोरा सैनीने ऐश्वर्या रॉयचे धन्यवाद मानले होते. कारण केवळ ऐश्वर्या रॉय तिच्या पाठिशी राहिली होती. फ्लोराने 2018 मध्ये एक फेसबुक पोस्ट करत निर्मात्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. तिच्या चेहऱ्यावर खोलवर झालेल्या जखमी देखील तिने दाखवल्या होत्या.
फेसबुक पोस्ट करत गौरांग दोषीवर केले होते गंभीर आरोप
फेसबुक पोस्ट करत फ्लोराने लिहिलं होतं की, हो..ही मीच आहे. मला प्रसिद्ध निर्माता असलेल्या गौरांग दोषीने मारहाण केली आहे. मी त्याच्यावर फार प्रेम करत होते, त्याच्यासोबत मी रिलेशनशिपमध्ये देखील होते. मात्र, मी एक वर्ष त्याचे अत्याचार सहन केले. मला समजलं नाहीच की, हे एवढ कसं वाढत गेलं. तो ताकदवान होता. त्यामुळेच हे सगळं घडलं होतं.