Famous Marathi Movie Poster : 'गवसाने प्रॉडक्शन हाऊस' आणि 'गायकवाड सन्स प्रॉडक्शन हाऊस' प्रस्तुत तसेच 'ए. जी प्रोडक्शन हाऊस' यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्दर्शक अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित 'फेमस' हा नवीन ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 


निर्माते मनोज गवळी, आशिष गुंजेकर, महेश संजय गायकवाड, अंकित बजाज, अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली असून या चित्रपटात अभिनेता महेश गायकवाड आणि स्वरूप सावंत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 


या पोस्टरमध्ये, दोन प्रमुख अभिनेत्यांमध्ये एक नायिका उभी आहे. पण ही नायिका पाठमोरी उभी आहे. त्यामुळे ती कोण असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तर महेश गायकवाड आणि स्वरूप सावंत यांच्यात नायिकेला कोण मिळवणार ही चुरशीची लढाई चित्रपटात पाहणंही रंजक ठरेल. या चित्रपटात मेघा शिंदे, साक्षी जाधव, प्रदीप शिंदे, विवेक यादव या कलाकारांना पाहणं रंजक ठरणार आहे. तर चित्रपटात बालकलाकार म्हणून शौर्य प्रदीप चाकणकर आणि श्रीतेज प्रसाद चाकणकर दिसणार आहेत. 


दिग्दर्शक अक्षय गवसाने म्हणाले...


चित्रपटाबाबत बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अक्षय नागनाथ गवसाने असे म्हणाले की, "चित्रपटसृष्टी आणि आमचं अगदी जवळचं नातं आहे. कारण चित्रपटसृष्टीत आमचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना कोणत्या अडचणी येतात, चित्रपट कसा बनतो हे आम्ही अगदी जवळून पाहिलं होतं. दरम्यान कॅटरिंगचे काम करताना पडद्यामागील तांत्रिक गोष्टी आवड म्हणून शिकत ही होतो. त्यावेळी मनात मी एक निश्चय केला की, एक दिवस आपण ही चित्रपटाची निर्मिती करायची. आणि अखेर आज तो दिवस आलाय, वडिलांना आणि घरच्यांना दिलेला शब्द आज पूर्ण होतोय, हा चित्रपट निखळ मनोरंजन आणि ऍक्शन थ्रिलरने भरलेला आहे. रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद फक्त पाठीशी ठेवा."


तर चित्रपटाचा मुख्य नायक महेश गायकवाड या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे, तो म्हणाला की, "चित्रपटात काम करणं आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मायेची थाप मिळवणं, त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं, असंच स्वप्न माझंही आहे. अभिनयाची आवड निर्माण होताच मी अभिनयाचे धडे घेतले. आणि मी अभिनेता म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय. तुम्ही मायबाप माझ्यावर प्रेम करून मला सांभाळून घ्याल हे नक्कीच."


महत्त्वाच्या बातम्या : 


Vaalvi: वाळवी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या