Apurva Nemlekar:'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंता या भूमिकेनं प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सध्या सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसणारी अपूर्वा बिगबॉसच्या चौथ्या सिजनमध्येही दिसली होती. बिगबॉसचे चौथे पर्व संपल्यावर तिचा सख्खा भाऊ तिनं गमावला. ती सोशल मिडियावर आपल्या वडिलांची आणि भावाची आठवण काढत तिनं एक भावूक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच ती हरिहरेश्वरला गेली होती. तिथं भाऊ आणि वडिलांची अस्थिविसर्जन केले असल्याचं सांगत तिनं पोस्ट केली आहे.


काय पोस्ट केलीये अपुर्वानं?


सर्वानाच माहीती आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे... प्रत्येकाला एक ना एक दिवस या सुंदर जिवनाचा निरोप घ्यायचाच आहे... आणि यां एकमेव मिळालेल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला लाभलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचा निरोप द्यायला ( detachment) हे कोणाला जमलय..?? माझा हा केविलवाणा प्रयत्न सुरूच आहे.... त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा त्याच वळनावर फिरून आले.. 


... आणि मी मनसोक्त रडले..


 श्री. क्षेत्र हरिहरेश्वर..(कोंकण दक्षिण काशी).., ही तिचं जागा जिथं मी माझ्या बाबांचं आणि भावाच अस्थिविसर्जन केलं होतं..आणि त्यांच ठिकाणीं त्या अथांग सागरावर पुन्हा एकदा उभ राहील्यावर थंड पाण्याचां स्पर्श जेव्हा झाला . तेंव्हा जणू अस वाटल की पप्पा आणि ओंकार ला घट्ट मिठी मारली आहे.आणि आज या अथांग सागरकिनारी दाटुन आलेला ढग सुद्धा बरसला, त्याचे सोबतच दाटून आलेल्या मनाचा सुद्धा डोळ्यातून बांध फुटला.. आणि मी मनसोक्त रडले....! 


 






दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्या


आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळया emotions आपणं अनुभवतो,शिकतो, अंमलात आणतो.. परंतू detachment ही एकमेव असं emotion आहे. की ते कोणी शिकवत नाही.त्याचा शोध आपल्याला स्वतःच घ्यावा लागतो .. असो detachment जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असाच सुरु राहील. परंतू जेव्हा जमेल तेव्हा यां दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावं..! म्हंणजे मन हलक होत.
मी, पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने.... लवकरच....