Prajakta Mali: सध्या प्राजक्ता माळी हिच्या फुलवंती सिनेमाची सर्वत्र एकच चर्चा आहे. मराठी सिनेसृष्टीत प्राजक्ताच्या लूकसह तिची अदाही प्रेक्षकांना सध्या भुरळ घालतेय. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती कादंबरीवर आधारित असणाऱ्या या सिनेमाला सिनेमागृहात चांगलाच प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय. नुकताच प्राजक्ता माळीनं पुण्यातील चित्रपटगृहं हाऊसफूल झाल्याचं सांगत इंन्स्टाग्रॅमवर पोस्ट केली आहे. आनंद गगनात मावत नाहीये असं म्हणत तिनं या चित्रपटाच्या प्रतिसादामुळे हायसं वाटतंय असं लिहित ही कृतज्ञ पोस्ट केली आहे.
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा फुलवंती चित्रपट आता चित्रटपगृहांमध्ये ११ ऑक्टोबरपासून दाखल झालाय. दोन तीन दिवसात फुलवंती चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
फुलवंतीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
प्राजक्ता माळीनं या चित्रपटात मुख्य भूमिकेत निर्मितीही केली आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. तिच्या भूमिकेसह तिच्या अदांचे सगळीकडे तुफान कौतूक होत आहे. प्रेक्षकांचा भन्नाट प्रतिसाद पाहून प्राजक्ता माळी भारावून गेली आहे. तिनं आपल्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट केली आहे. सोशल मिडियावर ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
काय म्हणलंय तिनं पोस्टमध्ये?
The best video till the date🎯
.किती आभार मानू? पुण्यातले जवळजवळ सगळे #shows housefull होताहेत, हे पाहून आनंद गगनात मावत नाहीये.
अभिनेत्री म्हणून आनंद आहेच आणि निर्माती म्हणून खूप हायसं वाटायला लागलंय.
.
सबंध महाराष्ट्रातून प्रेमाचा वर्षाव होतोय, #कृतज्ञ आहे.
असाच #लोभअसावा 🙏
.
#मराठीचित्रपट #मराठीमूलगी #मराठीप्रेक्षक #मराठीसंस्कृती #परंपरा #phullwanti__film #prajakttamali @🙏
असं पोस्ट करत प्राजक्ता माळीनं सगळ्यांचे आभार मानले आहेत.
सिनेमात हे कलाकार दिसणार
या दोघांसह या चित्रपटात; प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट,विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील कलाकारांची फौज दिसणार आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक,अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.