Parineeti Chopra Birthday: परिणीती चोप्रानं तिच्या बबली, रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटांमधील भूमिकांमुळं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. २०११ च्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून विविधपूर्ण सिनेमांमधून काम करत तर आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chaddha) यांच्याशी लग्नामुळं ती कायमच चर्चेत राहिली आहे. पण तिचं राघवशी जुळलं कसं याची अनेकांना उत्सुकता आहे.


22 ऑक्टोबर 1988 रोजी जन्मलेली परिणीती (Parineeti Chopra) यंदा तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.  इशकजादे, हसी तो फसी, मेरी प्यारी बिंदूसह अमर सिंग चमकीला, शुद्ध देसी रोमँस अशा ब्लॉकबस्टर सिनेमांमध्येही तिनं काम केलंय.  तर तिचा नवरा राघव चढ्ढा हे राजकारणात आहेत. यांची भेट कशी झाली? कधी पासून ते डेट करत होते? याविषयी अनेकांच्या मनात कुतुहल असते. 


राघव आणि परिणीतीची ओळख अशी झाली


राघव चढ्ढा यांनी दिल्लीतील मर्दान स्कूलमधून शिक्षण घेतले. तर २००९ मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.कॉमची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामधून CA केले. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलं. तसंच लंडनमध्ये त्यांना वेळ घालवायला आवडतं, असं चढ्ढा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.  परिणिती आणि लंडनमधील शैक्षणिक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. तेंव्हापासून दोघे मित्र आहेत.


सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसू लागले


राघव आणि परिणिती एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते आणि ते मित्र होते. यानंतर ते अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्रही दिसले. त्यामुळे ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरु होती. परिणितीने मँचेस्टर बिझनेस स्कूल UK येथून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला आहे. चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी तिने यशराज फिल्म्समध्ये PR सल्लागार म्हणून काम केले. त्याचवेळी या दोघांची घट्ट मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीतून ते एकमेकांच्या प्रेमात पडले.


चमकीला चित्रपटाच्या शुटिंगपासून डेटींग


'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार जेव्हा परिणीती पंजाबमध्ये तिच्या 'चमकीला' या चित्रपटासाठी शूटिंग करत होती तेव्हापासून ते डेटिंग करत असल्याचं सांगितलं जातं.  परिणितीच्या अलिकडील ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांपैकी  अमर सिंग  चमकीला हा चित्रपट आहे.दिलजीत दोसांझ आणि परिणीती यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा २०२४ सालचा बायोलॉजिकल ड्रामा, संगीतकार अमर सिंग चमकीला यांच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही पाहता येईल.