Entertainment News Live Updates 18 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 18 Jan 2023 03:36 PM
Gadad Andhar Trailer: 'गडद अंधार' चा ट्रेलर झाला रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Gadad Andhar Trailer : पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार' (Gadad Andhar) हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासूनच सर्वांच्या मनात या चित्रपटाबद्दल कुतूहल आहे. 'गडद अंधार'बाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असली तरी हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांना 3 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटातील 'दरिया...' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं, या गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातील म्युझिकसह ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. 'गडद अंधार'च्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, अल्पावधीतच लाखो व्ह्युजही मिळाले आहेत.


Gadad Andhar Trailer: 'गडद अंधार' चा ट्रेलर झाला रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Gadad Andhar Trailer : पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार' (Gadad Andhar) हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासूनच सर्वांच्या मनात या चित्रपटाबद्दल कुतूहल आहे. 'गडद अंधार'बाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असली तरी हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांना 3 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटातील 'दरिया...' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं, या गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातील म्युझिकसह ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. 'गडद अंधार'च्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, अल्पावधीतच लाखो व्ह्युजही मिळाले आहेत.


Rakhi Sawant: राखी सावंतचा झाला गर्भपात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राखी वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं मांडते. राखी वेगवेगळ्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. आता राखीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. राखीचा गर्भपात झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.



Radhika Merchant Mehndi: राधिका मर्चंटच्या हातावर रंगली अनंत अंबानीच्या नावाची मेहंदी; 'घर मोरे परदेसिया' वरील डान्सचा Video Viral

Anant Ambani Radhika Merchant Mehndi : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबाच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (17 जानेवारी) मेहंदी सोहळा पार पडला. ब्राईड टू बी रधिका मर्चंटचे मेहंदी सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राधिका ही खास लूकमध्ये दिसत आहे. तसेच राधिकाचा मेहंदी सोहळ्यातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राधिका 'घर मोरे पिया पर किया' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 



Sukh Mhanje Nakki Kay Asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील जयदीपचा हटके अंदाज; नवा लूक करुन शालिनीला शिकवणार धडा

Sukh Mhanje Nakki Kay Asta: छोट्या पडद्यावरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत जयदीप-गौरीची भेट तर झालीय. पण ज्या शालिनीमुळे जयदीप-गौरीला एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं तिला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. शालिनीला तिच्या पापांचं प्रायश्चित देण्यासाठी जयदीप वेष पालटून शिर्केपाटलांच्या घरात दाखल होणार आहे. यासाठी जयदीपने एका वृद्धाचा लूक केला असून तो लक्ष्मी इंडस्ट्रीजचा मालक म्हणजेच जयवंत देशमुख असल्याचं भासवणार आहे. 



Amala Paul : दाक्षिणात्य अभिनेत्रीला केरळमधील मंदिरात प्रवेश नाकारला; भावना व्यक्त करत म्हणाली, 'धार्मिक भेदभाव'

Amala Paul: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलला (Amala Paul) केरळमधील एका हिंदू मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. अमाला पॉलने आरोप केला आहे की, "धार्मिक भेदभावामुळे" तिला केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात प्रवेश करण्यापासून मंदिरामधील अधिकाऱ्यांनी रोखले. 



Ved Box Office Collection: रितेश- जिनिलियाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; 'वेड' चं कलेक्शन माहितीये?

Ved Box Office Collection : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा वेड हा चित्रपट 'वेड' (Ved) हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन-



Jaya Bachchan: 'अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे'; फोटोग्राफरवर पुन्हा भडकल्या जया बच्चन

Jaya Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी काल (17 जानेवारी) इंदूरच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे वर्च्युअली उपस्थित होते. नुकताच जया बच्चन यांचा इंदूर विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकल्या आहे, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 



Rakhi Sawant: मुकेश अंबानी मदत करतायत; मुकेश अंबानी मदत करतायत; आईच्या तब्येतीबाबत राखी सावंतने दिली महत्त्वाची माहिती

Rakhi Sawant: 'बिग बॉस' फेम अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही 'ड्रामा क्वीन' या नावाने ओळखली जाते. राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. राखीच्या आईवर उपचार सुरु आहेत. राखीने नुकतच मीडियासोबत चर्चा करताना सांगितलं की, "तिच्या आईच्या उपचारासाठी उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे तिची मदत करत आहेत." 



Quotation Gang Trailer: अंगावर शहारे आणणारा 'कोटेशन गँग'चा ट्रेलर रिलीज; सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत

Quotation Gang Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) यांच्या कोटेशन गँग (Quotation Gang) या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे तुम्हाला थक्क करतील. कोटेशन गँगच्या ट्रेलरमधील डायलॉग्सना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की या चित्रपटाचे कथानक गँगवॉरवर आधारित आहे.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Celebs Childhood Pics: फोटोतील ‘या’ क्युट मुलीला ओळखलंत का? गोविंदा आणि सलमानसोबत दिलेत हिट चित्रपट


Celebs Childhood Pics: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 'आपले आवडते कलाकार त्यांच्या बालपणी कसे दिसत असतील?', असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो.  नुकताच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या अभिनेत्रीनं गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan)  यांच्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल...


Chhatriwali ते Mission Majnu; 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात ओटीटीवर होणार रिलीज


This Week OTT Latest Release: जानेवारी महिन्यातील तिसरा आठड्यात ओटीटीवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. ओटीटीवरील (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळाली. या आठवड्यात काही सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होणार आहेत. या वीकेंडला  कोणता चित्रपट आणि वेब सीरिज कोणती पहायची? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज यांच्याबद्दल....


Popeye the Sailor Man : चिमुकल्यांचा आवडत्या पॉपॉयचा 94 वा बर्थडे, पालक खाऊन एनर्जी मिळणाऱ्या पॉपॉयची रंजक कहाणी माहीत आहे?


Popeye the Sailor Man: तुम्हाला Popeye आठवतोय का? तोच Popeye जो कोणतंही संकट आलं की, पटकन पालक खायचा आणि शत्रूशी, संकटाशी दोन हात करायचा. लहानग्यांपासून अनेक मोठ्यांचाही आवडता कार्टून शो 'Popeye the Sailor Man'. तुमच्या आमच्या आवडत्या Popeye ला आजच्याच दिवशी एक नवी ओळख मिळाली होती. आजच Popeyeचा जन्म झाला होता. आज हाच पॉपॉय 94 वर्षांचा झाला आहे. 


Popeye, एक काल्पनिक कार्टून पात्र. आजच्याच दिवशी पण तब्बल 94 वर्षांपूर्वी Popeye ला डेली किंग फीचर्स कॉमिक स्ट्रिप, थिम्बल थिएटरमध्ये एक पात्र म्हणून लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर अॅनिमेटेड कार्टूनच्या जगात थिएटर आणि टेलिव्हिजन जगतात Popeye रिलीज करण्यात आला. 


Pathaan OTT Release Date: 'पठाण' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या



Pathaan OTT Release Date: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने  काही निर्देश दिले आहेत. न्यायालयाने चित्रपटाला सबटायटल्स, क्लोज कॅप्शन आणि ऑडिओ डिस्क्रिप्शन जोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे सर्व बदल ओटीटी रिलीजबाबत सांगण्यात आले आहेत. यावेळी चित्रपटाची ओटीटी रिलीज डेटबाबत देखील खुलासा करण्यात आला आहे. 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.