Entertainment News Live Updates 14 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 14 Mar 2023 06:04 PM
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3'मध्ये संजय दत्तची एन्ट्री

Sanjay Dutt On Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात सुनील शेट्टी (Suniel Shetty), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि परेश रावल (Paresh Rawal) प्रमुख भूमिकेत आहेत. आता या सिनेमात संजय दत्तची (Sanjay Dutt) एन्ट्री झाल्याचे समोर आले आहे. 

Gaslight : सारा अली खानच्या 'गॅसलाइट'चा रहस्यमय ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Sara Ali Khan Gaslight Trailer Released : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) 'गॅसलाइट' (Gaslight) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सारा अली खानसह बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी आणि चित्रागंदा सिंहदेखील झळकत आहेत. 





Hunter : अन्ना इज बॅक! सुनील शेट्टीच्या 'हंटर'चा ट्रेलर रिलीज

Suniel Shetty Hunter Web Series : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3'मुळे चर्चेत असून आता एका वेगळ्या कलाकृतीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. सुनील शेट्टीच्या आगामी 'हंटर' (Hunter) या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 





Sukesh Chandrasekhar : 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर सिनेमा येणार

Sukesh Chandrasekhar Movie : सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हे नाव गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता या सुकेशवर सिनेमा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आनंद कुमार या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. 

CID मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन

Pradeep Uppoor Passed Away : सतीश कौशिक यांच्या निधनानंतर 'सीआयडी' (CID) या लोकप्रिय मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर (Pradeep Uppoor) यांचे निधन झाले आहे. प्रदीप यांनी मालिकांसह अनेक सिनेमांचीदेखील निर्मिती केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि 'सीआयडी' या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न अर्थात शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी प्रदीप यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे. 





The Elephant Whisperers : ऑस्कर विजेता 'द एलिफंट विस्परर्स' मधील 'रघु' रातोरात झाला स्टार

The Elephant Whisperers : 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या भारतीय माहितीपटाने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. या सिनेमाचं कथानक एक हत्ती आणि आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या जोडप्याभोवती फिरतं. सिनेमात दाखवण्यात आलेल्या हत्तीचं नाव 'रघू' असं आहे. आता या माहितीपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर पर्यटकांनी रघुला पाहण्यासाठी तामिळनाडूमधील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये (Theppakadu Elephant Camp) गर्दी केली आहे. 





Singham Again : आता माझी सटकली...अजय देवगण पुन्हा 'सिंघम'च्या भूमिकेत; 'सिंघम अगेन' कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Ajay Devgn Singham Again Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आणि रोहित शेट्टीची (Rohit Shetty) जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. अजयच्या लोकप्रिय सिनेमांच्या यादीत 'सिंघम' (Singham) सिनेमाचा समावेश आहे. 'सिंघम' आणि 'रिंघम रिटर्न्स' या सिनेमांच्या माध्यमातून अजयने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची अर्थात 'सिंघम अगेन'ची (Singham Again) घोषणा केली होती. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. 





Kanjoos Makhichoos Trailer: 'कंजूस मक्खीचूस' चा ट्रेलर पाहिलात?

Kanjoos Makhichoos Trailer:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कुणाल खेमू  (Kunal Khemu)  हा सध्या त्याच्या कंजूस मक्खीचूस (Kanjoos Makhichoos) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कुणाल हा एका कंजूष माणसाच्या भूमिकेत दिसत आहे. कंजूस मक्खीचूस या चित्रपटाच्या ट्रेलर नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 



Rohit Shetty: एकेकाळी जगत होता खडतर आयुष्य, आज आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीबद्दल




Madhuri Dixit: आईच्या निधनानंतर माधुरीची भावनिक पोस्ट; म्हणाली...

Madhuri Dixit: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचे रविवारी (12 मार्च) रोजी निधन झाले. स्नेहलता दीक्षित यांनी 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने माधुरी आणि दीक्षित कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आईच्या निधनानंतर माधुरीने एक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली. माधुरीने शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी स्नेहलता दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Oscars 2023: विजेत्याची निवड कशी केली जाते? कोण करतं मतदान? जाणून घ्या ऑस्कर पुरस्काराबद्दल


Oscars 2023 : 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. जगभरातील लोकांचे लक्ष लागले होते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास होता. कारण भारतातील दोन चित्रपटांनी हा पुरस्कार पटकावला. आता ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची कशी निवड केली जाते? हे विजेते मतदान करुन ठरवले जातात का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. जाणून घेऊयात ऑस्कर पुरस्कार विजेत्यांच्या निवड प्रक्रियेबद्दल...


Oscars Awards 2023 : व्हाऊचर्स, चॉकलेट्स, मिठाई अन्...; ऑस्कर पुरस्कार विजेत्याला देण्यात येणारं गिफ्ट हॅम्पर असतं लाखो डॉलर्सचं









ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान विजेत्यांना देण्यात आलेल्या गिफ्ट हॅम्परमध्ये 60 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. विविध खाद्यपदार्थ, चॉकलेट्स, मिठाई, गिफ्ट व्हाऊचर्स, सौंदर्यप्रसाधने, पेटा ब्रॅंडची ऊशी, अनेक ब्रॅंड्सच्या प्रॉडक्टवर डिस्काउंट ऑफर, ऑस्ट्रेलियाची मोफत ट्रिप, कॅनडाच्या आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची संधी असा अनेक गोष्टींचा या गिफ्ट हॅम्परमध्ये समावेश आहे. 





Oscars 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये भारताने रचला इतिहास; 'नाटू नाटू' गाण्यासह 'The Elephant Whisperers'ने मारली बाजी











95 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत होता. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या. भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म (Best Documentary Short Film) या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. तसेच आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यानं (Naatu Naatu) 'बेस्ट ओरिजनल सॉन्ग' या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे यंदा 'ऑस्कर 2023' भारतासाठी खूपच खास ठरला आहे.


बॉलिवूडची 'मस्तानी', 'डिंपल गर्ल' अर्थात दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) 'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत समावेश झाला होता. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील दीपिकाच्या क्लासी लुकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाने ऑस्करमध्येदेखील भारताचं नाव उंचावलं आहे.




 














- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.